मानाचा चौथा महागणपतीश्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट : ओरिसा पूरी येथील जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती
पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती यंदाच्या गणेशोत्सवात ओरिसा पुरी येथील जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. धार्मिक आणि पौराणिक देखाव्यांची परंपरा असणारे श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ यंदा १२४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. उत्सवात विधींसाठी जगन्नाथ मंदिरातील गुरुजी येणार असून श्री जगन्नाथ मंदिरातील धार्मिक विधी, भोग, कर्पूर आरती सांज शृंगार आरती आदी धार्मिक विधी देखील होणार आहेत.
गणेशोत्सवाच्या मंडपाचा वासा पूजन कार्यक्रम हेमंत रासने, उद्योगपती मनोज छाजेड, संजय चोरडिया, विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, डॉ. शैलेश गुजर, अमित गायकवाड, संजय दाते, सुभाष सरपाले, राजाभाऊ बलकवडे, रवी पठारे, श्याम खंडेलवाल, संजय भोसले, किशोर येनपुरे, प्रल्हाद राठी,शिरीष मोहिते, जीवन हेंद्रे, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, सर्व विश्वस्त मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते महिला सभासद उपस्थित होते.
श्री जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती ६० फूट लांब २० फूट रुंद ३५ फूट उंच असणार आहे. जगन्नाथ मंदिराच्या गाभार्यातील श्री जगन्नाथ, बलभ्रद ,सुभद्रा ,सुदर्शन या देवता असणार आहे. ३० फूट लांबी व ३० फूट उंचीचा भव्य प्रवेशद्वार मंडपाच्या अग्रभागी असणार आहे.