पुणे-
आम आदमी पक्षाच्या विमान नगर भागातील कार्यकर्त्या शितलताई कांडेलकर यांची चार चाकी इकोफोर्ड मोटार काल रात्री 09.12.23 रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत अज्ञात भामट्यांनी फोडली.आपले प्रभागातील काम पाहून काही विरोधकांनी हे कृत्य केले असल्याचा दावा या कार्यकर्तीने केला गेले वर्षभरापासून मी या विमान नगर भागात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत, बऱ्याच समस्यांची दखल घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन काम करत आहेत. यामुळेच कुठेतरी माझ्या गाडीची तोडफोड केली आहे असे शितल यांचे मत आहे.
गाडीच्या तोडफोडीनंतर आम आदमी पार्टीचे विविध पदाधिकारी यांनी शितल यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व विमान नगर पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश शेवाळे हे करत आहेत.

