-युरोपतील सर्वोच्च शिखर सर करण्यापूर्वी टीमची प्रॅक्टिस सुरु -2 वेळा माऊंट एलब्रूस सर करणारे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केली मोहिम आयोजित-चीननंतर जगातील सर्वात जास्त टंगस्टन मिळणाऱ्या शिखरावर 360 एक्स्पलोरेर मार्फत चढाई
मॉस्को( रशिया) : युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूसवर भारतातील 11 जण मोहिमेवर गेले असून 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवून इतिहास घडवनार आहेत. यापूर्वीच 11 ऑगस्ट रोजी टीमने मलि्बडेन नावाचे शिखरावर 12000 फूट उंचीवर चढाई केली आहे. टंगस्टन व विविध धातूचे सर्वात मोठी खनिजसंपत्ती असलेले हे शिखरावरील अगदी छोटे दगडही हिऱ्यासारखे चमकत होते. संभाजीनगर येथील दत्ता सरोदे, डॉ. प्रशांत काळे, किशोर नवकर, विनोद विभुते, सुरज सुलाने, रुपाली कचरे तसेच मैसूर येथील प्रीत केएस, लातूर येथील अजय गायकवाड, मध्यप्रदेश येथील चेतन परमार व 12 वर्षाची प्रीती सिंग यांनी या शिखरावर चढाई केली. कोणतेही उंच शिखर सर करण्याआधी उंचीवरील कमी ऑक्सिजनला आपले शरीर अनुकूल होण्यासाठी आधी छोटे शिखर सर केले जाते. याचा सराव म्हणून टीमने हे शिखर सर केले. याशिखरावर जाण्यापूर्वी रशियन आर्मीची परवानगीही टीमला मिळवावी लागली.
*टंगस्टन धातूचे शिखर-*या शिखरावर जगातील मौल्यवान असा टंगस्टन धातू मिळतो. जगात फक्त 2 ठिकाणी अशी शिखरे आहेत. चीननंतर रशियातील मलि्बडेन ह्या शिखरावर 1932 नंतर इथे हा धातू सापडला. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या जर्मन फौजा इथे माउंट एलबृसपर्यंत येऊन धडकल्या होत्या त्यावेळी इथल्या खाणीची बरीच नासधूस केली गेली. असे इतिहास असलेले मौल्यवान असलेल्या मलि्बडेन या शिखरावर जाण्यापूर्वी रशियन आर्मीपोस्टने टीमला चढाईसाठी परवानगी दिली.
*माउंट एल्ब्रूस विषयी-* रशिया मध्ये असलेले युरोप मधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्या मध्ये हे शिखर वसलेलं आहे. जॉर्जिया देशाच्या बोर्डर पासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यापैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे 25 डिग्री पर्यंत जात असते. वर्षभर येणारी सततची सुरु असलेली मोठ-मोठी वादळे, हाडे गोठवणारी थंडी इ. माउंट अल्ब्रूस चढाईतील अडचणी आहेत.
*360 एक्सप्लोरर विषयी-*360 एक्सप्लोरर मार्फत ही मोहीम आयोजित केली असून 360 एक्सप्लोरर हा ग्रुप जगभर साहसी मोहिमांचे आयोजन करत असतो. 360 एक्सप्लोरर च्या नावे गेल्या 5 वर्षात अनेक विश्वविक्रम आहेत. अतिशय अवघड व आव्हानात्मक मोहिमांचे योग्य नियोजन करण्यात 360 एक्सप्लोरर चा हातखंडा असून अमेरिका व कॅनडातही आनंद बनसोडे यांच्या या कंपनीला विशेष नामांकन मिळाले आहे.