पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात गंभीर मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या (Pune) नातेवाईकांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्यांनी ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांच्याशी बोलून अत्यावस्थ रुग्णांची माहिती घेतली. या स्फोटात तब्बल 16 लोक जखमी झाले होते. यातील YCM रुग्णालयात दाखल केलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला होता. उर्वरित दहा ससून हॉस्पिटलला हलवण्यात आले होते त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू आज झाला.उर्वरित आठ जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. याप्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे उपशहर प्रमुख आनंद गोयल शहर, शिव आरोग्य सेना आणि पदाधिकारी उपस्थित होते.
तळवडे रेडझोनमधील अनधिकृत ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोटात सहा महिला कामगारांचा काल होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या घटनेतील १० जखमी रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी आज २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर उर्वरित आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.