अनिल कपूरला राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्याकडून मिळाली खास प्रशंसा !
अनिल हे बिग बॉस OTT 3 चे ‘सर्वात तरुण आणि फिटेस्ट होस्ट’ अस का म्हणाले श्रद्धा आणि राजकुमार !
‘बिग बॉस ओटीटी ३’ संपला असून हा कार्यक्रम सगळ्यांना खास आठवणी देऊन गेला आहे. बिग बॉस ओटीटी ३ च्या एपिसोडमध्ये ‘स्त्री 2’ अभिनेते राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी नुकतीच हजेरी लावली असताना त्यांनी होस्ट अनिल कपूर यांची खास स्तुती केली ज्याने रिॲलिटी शोद्वारे होस्टिंगमध्ये पदार्पण केले होते. दोघांनी कपूर यांना “सर्वात तरुण आणि योग्य होस्ट” अस म्हटल असून अनिल कपूरचा फिटनेस आणि लूक हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.
तत्पूर्वी विकी कौशलने देखील अनिल कपूरच्या शोमध्ये त्यांचा फिटनेससाठी त्यांचं कौतुक केले होत. त्यांनी त्यांच्या चित्रपटातील व्हायरल गाणे ‘तौबा तौबा’ त्यांना समर्पित केले. अनिल कपूर आणि जेरेमी रेनर यांच्यासोबत दिसणारे डॉक्युमेंट-सीरीज ‘रेनरव्हेशन्स’चे निर्माते रोरी मिलिकिन यांनीही अभिनेत्याच्या फिटनेस बद्दल प्रशंसा केली होती. अनिल कपूरच्या होस्टिंग पदार्पणाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि शोचे रेटिंग हे त्याचे पुरावे आहेत.
चित्रपटाच्या आघाडीवर अनिल कपूर ‘सुभेदार’ साठी तयारी करत आहे जे त्याचे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्यासोबतचे पहिले सहकार्य आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वात सामील होणार असल्याचीही अफवा आहे.