महापुरुष अभिवादन कृती समिती आणि लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन
पुणे : अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. अशा या साहित्यरत्नाला २१ हजार पुस्तकांच्या संकलनातून पुणेकरांनी अभिवादन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पुणेकरांनी वाचलेली पुस्तके उपक्रमाला दिली आणि वाचण्यासाठी मोफत पुस्तके देखील घेतली. या शिवाय अनेक मुलांना ही पुस्तके वाचण्यासाठी मोफत देण्यात येणार आहेत
महापुरुष अभिवादन कृती समिती आणि लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात आला. सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याशेजारी पुस्तकाचे संकलन आणि वितरण करण्यात आले,महाराष्ट्रासह भारताच्या ग्रामीण भागात ग्रंथालयांचे जाळे निर्माण करणारे प्रदीप लोखंडे यांच्या हस्ते उपक्रमाचे उदघाटन झाले.
डिजिटल माध्यमाच्या जगात पुस्तके कोणी वाचत नाही किँवा वाचन संस्कृती नामशेष होईल असे म्हणाऱ्याना आज या उपक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे उत्तर आहे हे, असे प्रदीप लोखंडे हे म्हणाले.
यावेळी सुमारे अकरा हजार लोकांना एकतेचा संदेश देणाऱ्या जोगेश्वरी मिसळ चे वाटप करण्यात आले. जोगेश्वरी मिसळचे सचिन हरगुडे याचे उपक्रमास विशेष सहकार्य लाभले
चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्य कामगारांमधला आत्मविश्वास जागा करुन न्यूनगंड संपविण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले. ग्रंथपाल प्रसाद भरसावळे यांनी पुस्तक संकलनात हजारो पुस्तके भेट दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील नहार, राजेंद्र पायगुडे, सारंग सराफ,प्रल्हाद गवळी, विजय राजपूत,श्रीधर चव्हाण,रमेश जाधव, रवी गुडमेटी, पियुष शहा, दिलीप वाघमारे, योगेश खांबे, सुजित रणदिवे यांनी केले. नगरसेवसक राजाभाऊ बराटे, शंकर पवार, उद्योजक संतोष सावंत आणि विविध पक्षाचे आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी उपक्रमाला भेट दिली