बावधन व लवळे येथे नवीन अतिउच्चदाब उपकेंद्राला महावितरणची मंजूरी; १.६० लाख वीजग्राहकांना लाभ

Date:

बावधन, कोथरूड, वारजे, भूकूम, भूगाव, लवळे परिसरात होणार दर्जेदार वीजपुरवठा

पुणे, दि. ०१ ऑगस्ट २०२४: विजेची वाढती मागणी व सद्यस्थितीत असलेल्या वीजयंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी लवळे (ता. मुळशी) येथील प्रस्तावित नॉलेज सिटी १३२/२२ केव्ही व पुण्यातील बावधनमध्ये २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे. या दोन्ही उपकेंद्रामुळे बावधन, कोथरूड, वारजे, भूकूम, भूगाव, पिरंगुट, लवळे व नांदे या परिसराला आणखी दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे. 

पुणे परिमंडलातील वाढती विजेची मागणी व भविष्यातील वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी प्रस्तावित २१ अतिउच्चदाब उपकेंद्रांचा आराखडा मुख्यालयास सादर केला आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी पुणे परिमंडल अंतर्गत चऱ्होली येथे २२०/३३/२२ केव्ही प्राईड वर्ल्ड सिटी, मोशी येथे २२०/२२ केव्ही सफारी पार्क, ताथवडे येथे २२०/२२ केव्ही यशदा उपकेंद्र, बावधन येथील बावधन २२०/२२ केव्ही आणि लवळे येथील नॉलेज सिटी १३२/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यास मंजूरी दिली आहे. तसेच भोसरी येथील २२०/२२ केव्ही सेन्चुरी एन्का उपकेंद्रात ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास मंजूरी दिली आहे. हे सर्व मंजूर प्रस्ताव महावितरणकडून महापारेषणकडे पाठविण्यात आले आहेत.अतिउच्चदाबाचे नवीन उपकेंद्र उभारणे व क्षमतावाढीचे कामे महापारेषणकडून करण्यात येणार आहे.

महावितरणच्या शिवाजीनगर विभाग अंतर्गत बावधन येथील २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामुळे महापारेषणच्या एनसीएल १३२/२२/११, नांदेड सिटी २२०/२२ केव्ही आणि १३२/२२/११ केव्ही उपकेंद्रातील वीजभार कमी होणार आहे. बावधन येथील नव्या उपकेंद्रातील १० वीजवाहिन्यांद्वारे बावधन, चांदणी चौक, कोथरूड, वारजे परिसरातील ९५ हजार वीजग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होईल. तसेच मुळशी विभाग अंतर्गत मंजूर झालेल्या नॉलेज सिटी १३२/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील २२ केव्हीच्या १५ वीजवाहिन्यांद्वारे भूकूम, भूगाव, पिरंगुट, लवळे, नांदे, नॉलेज सिटी आदी परिसराला वीजपुरवठा करण्यात येईल. त्याचा थेट फायदा सुमारे ६५ हजार ग्राहकांना होईल. सोबतच पिरंगुट २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील १८ पैकी ४ वीजवाहिन्यांचा भार हा नॉलेज सिटी उपकेंद्राकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे पिरंगुट उपकेंद्रातील सध्याचा वीजभार कमी होईल. पर्यायाने या उपकेंद्रातील उर्वरित वीजवाहिन्यांवरील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना देखील आणखी सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होईल.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल- ‘पुणे परिमंडलामध्ये विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीजपुरवठ्यासाठी वितरण व पारेषणच्या वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व क्षमतावाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. बावधन व लवळे येथील महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रामुळे महावितरणच्या सर्व वर्गवारीतील सुमारे १ लाख ६० हजार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होईल’.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...