नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळे याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
स्वप्नील कुसाळे याची अत्यंत विलक्षण कामगिरी! पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केल्याबद्दल त्याचे अभिनंदन.
त्याचे हे यश अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण त्याने या स्पर्धेत उत्तम लवचिकता आणि कौशल्याचे दर्शन घडवले आहे. या क्रीडाप्रकारात पदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू देखील ठरला आहे.
प्रत्येक भारतीयाचे मन आनंदाने भरुन गेले आहे.”