मुंबई-मुलगा हवा होता म्हणून विद्या चव्हाणने तिच्या सुनेला त्रास दिला. दुसरे म्हणजे विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने त्याच्या आईसमान असलेल्या वहिणींवर हात घातला व तिचा विनयभंग केला, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला.
शरद पवार गटाच्या महिला आाघाडीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत विद्या चव्हाणांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्लाबोल चढवला. मला बोलायला लावू नका, झाकली मूठ सव्वालाखाची ती उघडायला लावू नका, नाहीतर शरद पवार साहेबांना त्याचा त्रास होईल, असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिला.
चित्रा वाघ म्हणाले की, विद्या चव्हाण या बाईने माझ्यावर विनाकारण आरोप करू नये. एक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी गेली होती तिथे विद्या चव्हाण यांची सून होती. विद्या चव्हाण यांना पहिला नातू अर्थात सूनेला मुलगा व्हावा अशी इच्छा होती. दुसरी मुलगी प्री मॅच्युअर होती यावरून त्रास दिला जात होता. त्यांच्या सूनेने मला कसा छळ केला जातो हे सांगितले. त्यांच्या धाकट्या मुलाने आपल्या वहिणीवर हात टाकला विनयभंग केला. सूनेने सासू विद्या चव्हाणकडे तक्रार केली. पण घरातल्या गोष्टी बाहेर नकोत हे सांगणाऱ्या विद्या चव्हाण होत्या. त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या आमदार होत्या. गुन्हा दाखल करतेवेळी पोलिस ठाण्यात येऊन धमकावत होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या की, विद्या चव्हाण यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. तीच पीडित महिला पवारसाहेब, जयंत पाटील यांच्याकडे गेली, मात्र कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही. ती मुलगी डॉक्टर आहे. त्या पोरीला केलं मी गाईड, काय करणार आहात विद्या चव्हाण? त्यांच्यातल्या कला मला माहित आहेत. हा जर अपराध असेल तर असे अपराध मी करत राहीन. लोकांसमोर जाण्याची त्या पीडित मुलीला मी सांगितलं. आज त्यामुळेच तिचे बाळ तिच्यासोबत आहे. बाईची व्यथा समजते, आई लेकरांची हाय विद्या चव्हाण यांना लागली आहे. सगळ्या केसेस ही विद्या चव्हाण हरली. एखाद्या बाईवर अन्याय होत असेल तर मी सहकार्य करणार आहे.
सुप्रिया ताई तुमच्या गॅंगला आवरा
चित्रा वाघ म्हणाल्या की, विषय राजकीय करायचा होता. म्हणून हे चव्हाण यांनी केलं. पवारसाहेब व सुप्रिया ताईंनी या गँगला आवरायला हवं. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. 20 वर्ष तुमच्या पक्षात होते. पण बापासारखं प्रेम केलं. माझ्या परिवाराला अडचणीत आणलं, माझी नावं 100 लोकांसोबत जोडली. सुप्रिया सुळेंनी अनेक महिलांना माझ्याविरुद्ध प्रेस कॉन्फरन्स घेऊन नको नको ते आरोप केले. आता परत हिला पाठवलं. तुमच्याकडे गौरी चव्हाण आली असती तर मदत केली असती का नाही? आम्ही अजूनही वाट बघतोय, 3 तासात देशमुखांनी पेनड्राईव्ह आणावा अन्यथा कोण कोण काय काय बोललं ते सांगू, असा इशारा चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना दिला.
विद्या चव्हाण यांनी काय केला होता आरोप?
शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाणांनी पत्रकार परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा व्हिडिओ ऐकवला आहे. सोमवारीच विद्या चव्हाण यांनी पेनड्राईव्ह बॅाम्ब टाकणार, तुमचे कारनामे उघड करणार असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज ऑडिओ ऐकवला असून चित्रा वाघ या इतरांचा वापर करून सापशिडीवर पुढे जाणाऱ्या नेत्या आहेत अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे.