पुणे (दि.२८) “२१ वे शतक हे भारताचे शतक असून संपूर्ण जगात भारतीय चमकदार कामगिरी करीत आहेत,अनेक देशातच नव्हे तर भारतात सुद्धा सर्व क्षेत्रांत पुढे जात आहे. महाराष्ट्र यात अग्रेसर आहे.” असे प्रतिपादन ले.जन.डॉ.डी.बी शेकटकर(निवृत्त) यांनी केले. ते बडोदे मित्रमंडळ पुणे आयोजित मेजर जयवंत रेगे स्मृतिव्याख्यानात “२१ शतकातील बदलते विश्व व भारताच्या जागतिक उलाढालीवर होणारा परिणाम” या विषयावर बोलत होते. एस.एम.जोशी सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी बडोदे मित्रमंडळ पुणे अध्यक्ष डॉ.जयसिंह पाटील, उपाध्यक्ष अतुल शहा, सचिव अच्युत यार्दी, विश्वस्त राजेंद्र माहुलकर, विश्वस्त डॉ.प्रभाकर जोशी, मेघा गोडबोले, श्रीनिवास सोनी, सयाजीराव गायकवाड, सुरेश रेगे आदी मान्यवरांच्या बरोबरच सदस्य व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी राजेंद्र माहुलकर यांनी बडोदे मित्रमंडळ स्थापने पासून सर्व माहिती दिली.डॉ.जयसिंह पाटील यांनी आगामी काळात सदस्य वाढ,तसेच बडोदा व पुणे यांनी सिस्टर सिटी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.