पुणे :दिनांक २३ जुलै २०२४रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या इयत्ता तिसरीच्या ३२० विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक जयंतीच्या निमित्ताने ‘केसरी वाडा’ येथे क्षेत्रभेट दिली.
शाळा समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ, ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने ,धनंजय तळपे व इयत्ता तिसरी चे वर्गशिक्षक यावेळी उपस्थित होते. केसरी वाडा येथे प्रथम लोकमान्य टिळकांच्या व गणपती बाप्पाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रिया इंदुलकर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातील महत्वाच्या घटना
सांगितल्या.टिळकांच्या वस्तू ,जुन्या काळातील प्रिंटर , टिळकांच्या आयुष्यातील विविध प्रसंग, मंडाले तुरुंगात गीतारहस्य लिहतानाची टिळकांची मूर्ती पाहून विद्यार्थी भारावले. त्यांनी बारकाईने तेथील सर्व वास्तु व वस्तूंचे निरीक्षण केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले असे मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी सांगितले. श्री.शैलेश टिळक यांनी मुलांशी संवाद साधला. तसेच त्यांना शाळेकडून स्मरणिका व नमशा@१२५ हे शाळेचे इतिहासाचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
अश्विनी राजवाडे, प्रतिभा पाखरे, स्वप्ना वाबळे ,संजीवनी प्रिया मंडलिक यांनी नियोजन केले.