तमाशाला प्रतिष्ठा,लोकमान्यता मिळत आहे- पद्मश्री रघुवीर खेडकर

Date:

बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक राजधानीचे वैभव ५८ व्या वर्धापन दिनी उल्हास पवार यांचे गौरवोद्गार

पुणे – :आपल्याला मिळालेला पद्म पुरस्कार हा आपला एकट्याचा नसून तो मराठी लोककलेला , लोककलावंतांना, पडद्यामागील कलावंतांना आणि लोककलेच्या रसिकांना मिळालेला पुरस्कार आहे. मात्र, हा पुरस्कार जितका सन्मानाचा आहे तेवढाच जबाबदारीचा आहे. याचे भान लोककलावंतांनी ठेवणे आवश्यक आहे, याची जाणीव पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी करून दिली तर बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराचे वैभव आहे. महाराष्ट्राचे लाडके हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारणी झालेल्या बालगंधर्व रंगमंदिर आता केवळ शहराच्या अथवा महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत, रसिकाग्रणी उल्हास पवार यांनी काढले.बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बालगंधर्व महोत्सवाचे अध्यक्षस्थानावरून उल्हास पवार बोलत होते.यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ संजय चोरडिया, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे,अभिनेते सुशांत शेलार,अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अशोककुमार सराफ,बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अलविरा मोशन एंटरटेन्मेंटच्या दिपाली कांबळे,ॲड. मंदार जोशी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात ‘मेलडी मेकर्स’च्या माध्यमातून सिने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोककुमार सराफ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पद्मश्री रघुवीर खेडेकर, जेष्ठ पत्रकार विद्याधर कुलकर्णी, सागर आव्हाड, विजय जगताप,राज देशमुख, गायिका सावनी दातार कुलकर्णी,अलविरा झरेकर, चित्रपट निर्माते दत्ता दळवी, मंगेश मोरे, डॉ. गौरव घोडे, लोककलावंत, लेखक व दंतचिकित्सक आशुतोष जावडेकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

आपल्याला मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कार हा आपल्या एकट्याचा नसून आपल्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान असल्याचे अशोककुमार सराफ यांनी कृतज्ञतेने नमूद केले. मेलडी मेकर्सने देशाच्या सर्व राज्यात आणि जगातील बहुतेक महत्त्वाच्या देशांमध्ये सादरीकरण केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या शेकडो कलाकारांच्या प्रयत्नांनीच हे शिखर गाठणे शक्य झाल्याचे ते म्हणाले. बालगंधर्व रंगमंदिर आणि मेलडी मेकर्स यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमाचे पहिले बुकिंग मेलडी मेकर्सचे असल्याचे सराफ यांनी अभिमानाने नमूद केले. सुरुवातीच्या काळात बालगंधर्व रंगमंदिरात साऊंड सिस्टिम नसल्याने तब्बल एक महिना मेलडी मेकर्सची साऊंड सिस्टिम रंगमंदिरात वापरण्यात आल्याची आठवणही त्यांनी कथन केली. शाळकरी मित्रांच्या कला प्रेमामुळे एकत्र आलेल्या कलाकार मित्रांचा पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी झालेला पहिला कार्यक्रम ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मेलडी मेकर्स हा वाद्यवृंद, हा प्रवास सराफ यांनी कथन केला.

मेलडी मेकर्स या संगीत क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या वाद्यवृंदाचा प्रवास पुस्तक स्वरूपात उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा राजेश पांडे यांनी व्यक्त केली. चित्रपट महामंडळाने महाराष्ट्रातील चित्रपट सृष्टीला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बालगंधर्व रंग मदिराचा पुनर्विकास निश्चितच स्वागतार्हमेघराज राजेभोसले

बालगंधर्व रंगमंदिर हा कलाकारांबरोबरच केवळ पुण्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कला रसिकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बालगंधर्व रंग मदिराचा पुनर्विकास निश्चितच स्वागतार्ह आहे. कलाकार म्हणून आमच्याकडून त्याला कोणतीही आडकाठी नाही. आम्ही त्याला सहकार्य करू. मात्र, हा पुनर्विकास कलाकारांना विश्वासात घेऊन केला जावा, अशी अपेक्षा मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केली. मुंबईप्रमाणेच पुण्यातही चित्रनगरी व्हावी, या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. फेब्रुवारी २०२७ महिन्यात चित्रपट महामंडळाच्या वतीने पुण्यात चित्रपट संमेलन आयोजित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले तर अनिल गुंजाळ यांनी आभार मानले.

‘लोकरंग त्रिवेणी’ या कार्यक्रमात खेडकर म्हणाले,’तमाशाला प्रतिष्ठा, लोकमान्यता मिळत आहे

तर १८ व्या बालगंधर्व महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकरंग त्रिवेणी’ या कार्यक्रमात खेडकर बोलत होते. या कार्यक्रमात खेडकर यांच्यासह मराठी लोकसंगीतातील ज्येष्ठ गायक आनंद शिंदे सहभागी झाले. लोककला अभ्यासक भूषण कोरगावकर आणि पराग चौधरी यांनी या मान्यवरांना बोलते केले.यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अलविरा मोशन एंटरटेन्मेंटच्या दिपाली कांबळे,चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दीर्घकाळ तमाशासारख्या लोककलांना लोकाश्रय असला तरी देखील समाज मान्यता नव्हती. समाजाकडून तमाशाला प्रतिष्ठा दिली जात नव्हती. पद्म पुरस्कार मिळाल्यामुळे ही परिस्थिती बदलली आहे. तमाशाला लोकमान्यता मिळत आहे. मात्र, या पुरस्काराने तमाशा कलावंतांचा जितका सन्मान झाला आहे तितकीच त्यांची जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून लोककलावंतांनी आपल्या सादरीकरणाला चौकट घालून घेणे आवश्यक आहे, असे मत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केले. या जबाबदारीचे भान लोक कलावंतांनी ठेवले तर लोक कलेला पुन्हा चांगले दिवस येतील अन्यथा ती नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अश्लीलता लोककलांमध्ये नव्हे तर तिचा आस्वाद घेणाऱ्यांमध्ये – आनंद शिंदे यांचा दावा

अश्लीलता ही सापेक्ष संकल्पना आहे. शास्त्रीय संगीत ज्याप्रमाणे चौकटीत बांधलेले असते त्याप्रमाणे लोकसंख्येची कोणतीही चौकट नसते. त्यामुळे लोककलांमधील शृंगार आणि विनोद अश्लील तिकडे झुकत असल्याचा आरोप केला जातो. मात्र, अश्लीलता ही लोककलांमध्ये नव्हे तर तिचा आस्वाद घेणाऱ्यांमध्ये असते, असा दावा आनंद शिंदे यांनी केला. आपण सादर केलेल्या कोणत्याही गाण्यांमध्ये द्वयर्थ नाही. मात्र, ती गाणी ऐकणारे लोकच आपापल्या बुद्धीने त्या गाण्यांचा मूळ अर्थ बाजूला ठेवून भलतेच अर्थ लावत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अश्लील त्याच्या मुद्द्यावरून लोककलेच्या मुशीत घडलेले विख्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या दादा कोंडके यांनी अनेकदा सेन्सर बोर्डाला पेचात पकडल्याची आठवणही शिंदे यांनी करून दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बारीपासून वारीपर्यंत सर्व कलांचे रसिकाग्रणी असलेल्या आनंद शिंदे यांनी लोककलांचे महत्त्व विशद केले. खुद्द घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शास्त्रीय संगीताची सखोल माहिती होती. तसेच लोककलांच्या प्रभावाची पुरेपूर जाणीव होती, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दोन तासाचे भाषण जेवढ प्रभाव निर्माण करू शकत नाही तेवढा प्रभाव अर्ध्या तासाचा जलसा निर्माण करू शकतो, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळेच आंबेडकरी चळवळीत आंबेडकरी जलशांना महत्त्व असल्याचे आनंद शिंदे यांनी नमूद केले.

बालगंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवशीची सुरुवात गणेश वंदना सादरकर्त्या अंजली राऊत आणि सहकारी ,संगीत कलानिधीचे देणे,नारीशक्ती नृत्य नाटिका लोकरंग त्रिवेणीसह मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटातील कलावंतांची थेट भेट, विदुषी सानिया पाटणकर आणि सहकलावंतांचा नाट्यभक्ती स्वरधारा, सचिन, शैलेश येवले व सह कलाकारांचा वंदना महामानवांना, लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपुर यांच्या अमित गाण्यांची यादे, हर मॅजेस्टी ही संगीत रजनी या कार्यक्रमांचा आस्वाद संगीत आणि बालगंधर्व रंगमंदिर प्रेमींनी घेतला.

तर दुसऱ्या दिवशी करावके हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम,बबल शो,जादूचे प्रयोग आणि रंगतदार पारंपारिक लावणी सादर झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी तातडीने एसओपी तयार करा

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे आदेश पुणे, दि. २५...

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस,...