भाजप नेतृत्वातच महायुतीचे सरकार बनेल
पुणे-विरोधक आमच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, पण भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार हे शरद पवार आहेत, त्यांनीच भ्रष्ट्राचाराला संस्थात्मक करण्याचे काम केले, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केला. ते पुण्यात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल चढवला.जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते आणि शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण गायब होते, असे म्हणत अमित शहा यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात आयोजित महाराष्ट्र भाजप अधिवेशनात ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
अमित शहा पुढे बोलताना म्हणाले की, या बैठकीतील माझे शब्द लक्षात ठेवून घरी जा. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचंड बहुमतामध्ये महायुतीचे सरकार बनेल. अन् हे सरकार भाजपच्याच नेतृत्वाखालीच बनेल, असा दावा त्यांनी केला.
2014 ते 2024 या काळातील तीन निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केले आहे. परंतु काही लोकांना अपयश आले तरी देखील त्यांच्यात अहंकार आला आहे, असे म्हणत शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणणारे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत उद्धव ठाकरे, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला. कॉंग्रेसवाले अनेक अपप्रचार करत आहेत. परंतु यांनी 60 वर्षांमध्ये गरीबांच्या कल्याणासाठी काय काम केले. हे काहीही करू शकत नाही. आरक्षणाचा अपप्रचार केला. संविधान हटावचा अपप्रचार केला, पण आता त्यांचा प्रचार आता चालणार नाही. लोकांना त्यांचा खोटा अपप्रचार समजला आहे, असेही शहा म्हणाले.
जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षण मिळाले आहे. तर जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार आले तेव्हा मराठा आरक्षण गायब झाले. आता पुन्हा मराठा आरक्षण देखील महायुतीच्या सरकारने दिले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम हे भाजपने केले आहे. आम्ही एक ग्रॅम देखील दूधाची पावडर आयात केलेली नाही आणि करणार देखील नाही. परंतु दूध पावडर आयातीचा निर्णय हा शरद पवारांचा आहे. त्यांनी हा अद्यादेश काढून ठेवलेला आहे.जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते आणि शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण गायब होते, असे म्हणत अमित शहा यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण पुन्हा होईल, असेही शहा म्हणाले.
अमित शहा म्हणाले की, मी आज शरद पवारांना सांगायला आलोय, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व उत्तर देत आहेत. पण माझं लांबून एक निरीक्षण आहे, ते मी आता तुमच्यासमोर सांगत आहे. महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचे सरकार येतं, मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्या आघाडीचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं. मी विचार करुन हे वाक्य बोलतं.
महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपचं सरकार आले. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकलं. मध्यंतरी शरद पवार यांचं सरकार आलं, मराठा आरक्षण गायब झालं. आम्ही पुन्हा आलो. आम्ही आतासुद्धा मराठा आरक्षण देण्याचं काम केलं आहे. शरद पवार यांचं सरकार येईल, तेव्हा मराठा आरक्षण पुन्हा गायब होईल. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर कुणाचं सरकार आणलं पाहिजे? समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम भाजपने केलं आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली.
आम्ही एक ग्रॅम देखील दूधाची पावडर गेल्या दहा वर्षात आयात केलेली नाही आणि करणार देखील नाही. परंतु दूध पावडर आयातीचा निर्णय हा शरद पवारांचा आहे. त्यांनीच हा अद्यादेश त्यांच्या कार्यकाळात काढलेला आहे. खोटा प्रचार करुन लोकांची दिशाभूल करण्याचे काम शरद पवारांसह विरोधकांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांप्रती, गोरगरीबांप्रती भाजप सरकार बांधिल आहे, असेही अमित शहा म्हणाले.