पोखरी येथील आदिवासी व डोंगरी भाग आणि रास्ता पेठेतील विद्यार्थ्यांना मदत
पुणे : टिळक चौकातील श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथील आदिवासी व डोंगरी भागातील श्री पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्री पंढरीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि रास्ता पेठेतील प्रल्हाद केशव अत्रे प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या.
श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सिटी यांच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234-D2 नवनिर्वाचित प्रांतपाल विजय सारडा, उप प्रांतपाल राजेश अगरवाल, उपप्रांतपाल श्रेयस दीक्षित, माजी प्रांतपाल बी.एल. जोशी, उत्सव प्रमुख महेश अंबिके, ज्येष्ठ सदस्य रमेश मणियार, उपस्थित होते.
दीपक थोरात म्हणाले, श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मागील वर्षी आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील आदिवासी आश्रम शाळेतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचे संच मंदिरातर्फे देण्यात आले होते. यावर्षी श्री पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्री पंढरीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुक्काम पोस्ट पोखरी आदिवासी व डोंगरी भाग आंबेगाव तालुका आणि रास्ता पेठ येथील प्रल्हाद केशव अत्रे प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी ७०० वह्या देण्यात आल्या. सदर सामाजिक उपक्रमास लायन्स क्लब ऑफ पुणे सिटी यांचे सहकार्य लाभले

