शंकराचार्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता थेट अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनोट थेट मुख्यमंत्र्यांसाठी मैदानात उतरल्या आहेत.त्यांनी थेट शंकराचार्यांना सुनावण्याचा प्रकार या ट्वीट द्वारे केला आहे.शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दांचा, प्रभावाचा आणि धार्मिक शिक्षणाचा गैरवापर केला आहे असा आरोप क्कार्णारी प्रतिक्रिया कंगना रनोटने दिली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केला आहे. या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
कंगना रनोट यांचे ट्विट काय?
कंगना यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ”राजकारणात, युती, आघाडी, पक्ष व नेत्यांमधील करार आणि एखाद्या पक्षाचं विभाजन होणं अत्यंत सामान्य तसेच संवैधानिक (घटनात्मक) बाब आहे. 1907 साली, 1971 साली काँग्रेस पक्षाचं विभाजन झालं होतं. राजकारणी लोक राजकारणात राजकारण करणार नाहीत तर मग काय गोलगप्पे (पाणीपुरी) विकणार का?”.तसेच पुढे त्यांनी म्हंटले आहे की, शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दांचा, प्रभावाचा आणि धार्मिक शिक्षणाचा गैरवापर केला आहे. धर्म असं सांगतो की, राजाच जर प्रजेचं शोषण करू लागला तर देशद्रोह हा शेवटचा धर्म आहे. शंकराचार्यांनी महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला आहे. त्यांनी अपमानजनक शब्दांचा वापर करून मुख्यमंत्र्यांवर देशद्रोही, गद्दार व विश्वासघातकी असल्याचा आरोप करत सर्वांचा भावना दुखावल्या आहेत. शंकराचार्य अशा छोट्या आणि क्षुल्लक गोष्टी सांगून हिंदू धर्माची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत”.
मुख्यमंत्री शिंदेंबद्दल काय म्हणाले होते शंकराचार्य?
नुकतेच शंकराचार्य यांनी मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, कोणाचं हिंदुत्तव खरं आणि कोणाचं खोटं हे जाणून घ्यावं लागेल. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. जो सहनशील आहे, विश्वासघातही सहन करतो तेच खरा हिंदू असणार. ज्यांनी विश्वासघात केला ते हिंदू असू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला, ही बाब लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनही स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनेही मतपेटीचया माध्यमातून तोच संदेश दिला आहे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्यावर टीका केली होती.