Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रोजगार मेळाव्यात उमेदवारांची निवड व्हावी यासाठी शिकाऊ उमेदवारी योजनेवर भर द्यावा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Date:

पुणे, दि.१५: जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त येत्या २७ जुलै रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कंपन्यांना कौशल्यप्राप्त उमेदवार मिळतील यासाठी शिकाऊ उमेदवारी योजनेवर अधिक भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

छत्रपती शिवाजीनगरन येथील मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. दिवसे बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी पुणे सचिन बारवकर, डॉ. अर्चना पठारे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन उदास, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांच्यासह किरण साळी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना उत्पादने पुरविणाऱ्या लघुउद्योगांना मनुष्यबळाची मोठी कमतरता असून ही चांगली संधी असल्याचे सर्व माध्यमातून उमेदवारांपर्यंत पोहोचवावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून चांगल्याप्रकारे प्रशिक्षीत झालेले मनुष्यबळ मिळावे ही उद्योगांची अपेक्षा असते. त्यास अनुसरुन उमेदवारांवर लक्ष्य केंद्रीत करावे. क्षेत्रनिहाय मागणी आणि पुरवठा याबाबत नियोजन करावे. सर्व शासकीय व खासगी आयटीआयना मेळाव्यासाठी आपल्याकडील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठविण्याबाबत कळविण्यात यावे.

केंद्र शासनाची प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (एनएपीएस) अंतर्गत १ हजार ५०० रुपये दिले जातात. नुकतेच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ६ ते १० हजार रुपये अशी भरीव रक्कम देऊन उमेदवारांना कुशल, अर्धकुशल करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना चांगले प्रशिक्षण मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

शहर व जिल्ह्यातील एमआयडीसी तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज असोसिएशनसह सर्व मोठ्या आणि लहान औद्योगिक संघटना यांनी समन्वयाने सर्व आस्थापना, लघु उत्पादक, हॉटेल व्यवसायिक, पर्यटन व्यवसाय, आदरातिथ्य व्यवसाय तसेच विविध सेवा क्षेत्रातील आस्थापना यांना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे. मेळाव्याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करावी, असेही ते म्हणाले.

श्री. जाधव यांनी मेळाव्याच्या आयोजनाच्या अनुषंगाने माहिती दिली. या मेळाव्यात रोजगाराच्यादृष्टीने कंपन्या आणि उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे. त्यासोबतच स्वयंरोजगाराच्यादृष्टीने सर्व विकास महामंडळे, सारथी, बार्टी, महाज्योती आदी संस्था तसेच केंद्र व राज्य शासनाच्या स्वयंरोजगार विषयक योजना राबविणारे कृषी, सहकार आदी तसेच सर्व बँका आदींना बोलावण्यात येणार आहे. उमेदवारांचे अर्ज गुगल फॉर्मवरुन भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच मेळाव्याच्या ठिकाणीदेखील नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराची माहिती देण्यासाठी व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस समर्थ युवा फौंडेशनचे निलेशभटनागर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

8000 कोटीच्या थकीत कर्जामुळे 6 बँका संकटात

मुंबई: दूरसंचार कंपनी एमटीएनएल सात बँकांकडून आणि इतर काही...

मुंबई-पुणे महामार्गावरील पुण्यातील तिघांचा मृत्यू

पुणे:मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा परिसरात रविवारी रात्री भरधाव ट्रकने मोटारीला...

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात:भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे...