लक्ष्मी रस्त्यावरील श्री राघवेंद्र स्वामींच्या मठामध्ये मंत्रालय पीठाधीश १०८ डॉ. श्री श्री सुबुधेंद्र तीर्थ स्वामींच्या हस्ते पूजन
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील श्री राघवेंद्र स्वामींच्या मठामध्ये मंत्रालयचे (आंध्र प्रदेश) पीठाधीश १०८ डॉ. श्री श्री सुबुधेंद्र तीर्थ स्वामींच्या हस्ते श्री धीरेंद्र तीर्थ सभा मंडपाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
श्री वरदेंद्र तीर्थ स्वामींच्या आराधना महोत्सवानिमित्त डॉ. श्री श्री सुबुधेंद्र तीर्थ स्वामींचे पुण्यामध्ये आगमन झाले होते.या कार्यक्रमासाठी ॲड. पी. नारायण, वास्तुशास्त्रज्ञ सुनील हिंगमिरे, न्यायाधीश राजेंद्र जामकर, राजायस अप्रमेय मंत्रालय, बंगलोरहून किरण मंत्री, मधुसूदन इनामदार, मुंबईहून दीपक वैद्य, मठाचे व्यवस्थापक श्रीनिवास नंजनगुड, दत्तात्रेय जोशी यावेळी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
श्री वरदेंद्र तीर्थ स्वामींच्या मध्यराधनाच्या मुहूर्तावर हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या भव्य प्रासादामध्ये वेद विद्या पाठशाला सुरू करण्याचा मानस असल्याचे स्वामीजींनी सांगितले.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील राघवेंद्र स्वामी मठ २५० वर्षे जुना आहे. श्री वरदेंद्र तीर्थ स्वामी आराधना महोत्सव आणि श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव असे दोन महोत्सव वर्षाभरात होतात. यावेळी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहतात. या आराधना महोत्सवामध्ये फलपंचामृत, अष्टोत्तर पारायण, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम होतात.
आंध्रप्रदेश मधील मंत्रालय हे श्री राघवेंद्र स्वामी यांचे मूळ स्थान आहे. तेथील पीठाधीश असलेले डॉ. श्री श्री सुबुधेंद्र तीर्थ स्वामी यांच्या कृपेने पुण्यातील श्री राघवेंद्र स्वामी मठाचा विकास होत आहे.