भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ कथक पाठशाला ‘ आयोजित ‘संत गाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संत काव्यावर आधारीत शास्त्रीय नृत्यरचना यावेळी सादर करण्यात आल्या. ‘ संत गाथा ‘ या कार्यक्रमात १६ नृत्य संस्थांनी आपले नृत्य सादरीकरण केले. संत साहित्यावर अतिशय नाविन्यपूर्ण रचना आणि नृत्यप्रकार सर्व कलाकारांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. रविवार,१४ जुलै रोजी सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.रसिकांना तो विनामूल्य खुला होता.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे , डॉ.निलीमा देशपांडे -हिरवे , कथक पाठशालेच्या संस्थापक नेहा मुथियान आदी मान्यवर उपस्थित होते. श्वेता राजोपाध्ये , ऋचा ढेकणे यांनी निवेदन केले.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१८ वा कार्यक्रम होता.