विधान परिषद निवडणूक:भाजपचे 5, NCP व शिवसेनेचे प्रत्येकी 2 तर काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी; काँग्रेसची मते फुटल्याचा दावा

Date:

उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकरांची मुसंडी –

भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर – 26 मते
2) पंकजा मुंडे – 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे – 26 मते
5) सदाभाऊ खोत – 24

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी
2) कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

  1. शिवाजीराव गर्जे
  2. राजेश विटेकर

काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव – 26

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )

1)मिलिंद नार्वेकर

​​​​​​​पराभूत उमेदवार – जयंत पाटील (NCP शरद पवार पुरस्कृत)

विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये

काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली
दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा
शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही
उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही
भाजपचे तरूण चेहरे विधानपरिषदेत दिसणार
पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन
अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत
योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व
सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार
11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

विधान परिषदेचे 11 सदस्य 27 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यांची जागा भरण्यासाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत सध्या 274 आमदार आहेत. ज्यांनी त्यांना मतदान केले. गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले गणपत गायकवाड यांनीही मतदान केले. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महायुतीने (एनडीए) निवडणुकीत नऊ उमेदवार उभे केले होते. यामध्ये भाजपचे सर्वाधिक 5 उमेदवार होते, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडे प्रत्येकी दोन उमेदवार होते. विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात होते.यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना-यूबीटीने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात राष्ट्रवादी-सपा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता .

मिलिंद नार्वेकरांची मुसंडी

उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील व्यक्ती आणि सर्वपक्षीयांशी सुमधूर संबंध राखून असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सगळ्यांचे अंदाज चुकवत राजकीय चमत्कार करुन दाखवला. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या (MLC Election 2024) रिंगणात उतरवले होते. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या जागेसाठी चुरशीची लढत होणार हे अपेक्षित होते. महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडे असलेले आमदारांचे संख्याबळ पाहता 11 व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर यांना संघर्ष करावा लागेल, असे चित्र होते. पण विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मतमोजणी सुरु झाल्यानंतर 274 मतांची 11 गठ्ठ्यांमध्ये विभागणी करण्यात आली. या मतांची मोजणी सुरु झाली तेव्हा पहिल्या टप्प्यातच मिलिंद नार्वेकर यांनी अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली.ही परिस्थिती पाहता मिलिंद नार्वेकर हे सर्वात पहिले विजयी होतील, असे वाटत होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात मिलिंद नार्वेकर यांची गाडी 20 मतांवर जाऊन अडली. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्या मतांची गाडी एक-एक करुन पुढे सरकत होती. पहिल्या टप्प्यात त्यांच्यामागे असलेल्या उमेदवारांनी मुसंडी मारत विजय मिळवला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...