
मुंबई-विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक झाली. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात सर्वच्या सर्व 274 आमदारांनी आपला मताधिकार बजावला. आता 5 वा. प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. त्यानंतर काही तासांतच निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे 9 व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे 3 असे एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे कोणत्या तरी एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक झाली. त्यात विधानसभेतील सर्वच्या सर्व म्हणजे 274 आमदारांनी मतदान केले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या परवानगीनुसार लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही तासांतच विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे.विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झाले. त्यात विधानसभेतील सर्व 274 आमदारांनी आपला मताधिकार बजावला. या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे कोणत्या तरी एका पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होणे निश्चित आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पराभवाची चव चाखावी लागणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.