पुणे- दुचाक्या चोरणारी २ अल्पवयीन मुले भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडली आहेत त्यांच्याकडून 4 बाईक चोरीचे गुन्हे उघड झालेत . याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५७६/२०२४, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार निलेश खैरमोडे व सचिन गाडे यांना सदरच्या गुन्हयातील चोरीस गेले दुचाकी गाडी घेवुन दोन विधीसंघर्षीत बालक राजे चौक, आंबेगाव पठार, पुणे येथे फिरत आहेत अशी बातमी मिळाली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी राजे चौक, आंबेगाव पठार, पुणे या भागात जावुन पाहता तेथे दोन विधीसंघर्षीत बालक नमुद गुन्हयातील चोरीस गेली हिरो कंपनीची स्प्लेंन्डर प्रो दुचाकी मोटार सायकल, वर फिरत असताना मिळुन आल्याने त्याचेकडे त्याबाबत तपास करता त्यांनी गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने ते पंचनाम्याने जप्त केले आहेत. बालकाकडे अधिक चौकशी करता त्यांनी पुणे शहरात आणखीन दुचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यानुसार बालकाने सांगितल्या ठिकाणाहुन ३ दुचाकी गाड्या जप्त करुन चार गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार निलेश खैरमोडे, सचिन गाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, सतिश मोरे, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.
दुचाक्या चोरणारी २ अल्पवयीन मुले पकडली
Date:

