पीएमपीएमएलच्या सक्षमीकरणासाठी विविध विषयांचा आढावा !
पुणे- सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो आणि pmpml ला भेटीदेऊन बैठका घेत चर्चा करून विविध सूचना आणि निर्देश दिले . यावेळी PMPML २२६डिझेल बसेस आता CNG मध्ये रूपांतरित करणार असल्याचे ठरल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात मोहोळ यांनी म्हटले आहे कि,’ आपल्या पुणे शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या पीएमपीएमएलचं सक्षमीकरण करणे, हा आपला प्राधान्याचा विषय असून या संदर्भात पीएमपीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि विविध विभाग प्रमुखांशी चर्चा केली. स्वारगेट येथील पीएमपीएमएलच्या मुख्यालयात घेतलेल्या या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद साधला. शिवाय संस्थेच्या सद्यस्थितीची माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे (PPT) घेतली.पुणे शहरात मेट्रो मार्गांचा विस्तार होत असला तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची लोकसंख्या लक्षात घेता आवश्यक बसेसची संख्या पूर्ण करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने एकूण ७७७ नवीन बसेस लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.शहराचे पर्यावरण व सार्वजनिक वाहतूक यांचा समतोल साधण्यासाठी डिझेल बसेसचे रूपांतर CNG बसेसमध्ये करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. २२६ डिझेल बसेस आता CNG बसेसमध्ये लवकरच रूपांतरित करण्यात येणार आहेत, तशी प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे.याप्रसंगी पीएमपीएमएलशी संबंधित विविध विकास प्रकल्प तसेच समस्या जाणून घेतल्या आणि प्रलंबिय विषय सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.बैठकीस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रज्ञा पोतदार-पवार, यांच्यासह पीएमपीएमएल चे खातेप्रमुख/विभागप्रमुख उपस्थित होते.