पुणे- महापालिका हद्दीतील वर्षानुवर्षे कमी कमी होत चाललेल्या ‘स्मार्ट’मुताऱ्या आणि स्वच्छतागृहांची पाहणी करायची इच्छया कोणाची होईल ? कुठले आयुक्त हे पाहतील ? हे प्रश्न जरी तुमच्या समोर असले तरी आता थेट आम आदमी पार्टीने महापालिका आयुक्तांना अशा पाहणीचे निमंत्रणच दिले आहे. लोकसंख्या वाढली, शहर वाढले … कर वाढला महापालिकेचे उत्पन्न वाढले , मेट्रो आली, विमानतळे सजली पण शहर आणि महापालिका हद्दीतील मुताऱ्या आणि स्वच्छतागृहांची अवस्था आहे तरी कशी ? या प्रश्नाचे उत्तर कोणते आयुक्त लोकांच्यात येऊन देतील ? हे सारे आता आपच्या आंदोलनाने पुढे आणले आहे.
स्मार्ट सिटी असलेल्या पुणे शहरातील स्वच्छतागृहांची अत्यंत दुरावस्था झालेली असून अनेक ठिकाणी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून बनविलेल्या ई टॉयलेट बंद आहेत. पुणे शहराची लोकसंख्या पाहता आवश्यक प्रमाणात स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यासही महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तसेच जी स्वच्छतागृह उपलब्ध आहेत त्यांची स्वच्छता व्यवस्थित राखली जात नसून त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. महिलांची तर याहून अधिक वाईट परिस्थिती आहे महिलांसाठी फारशी स्वच्छतागृहेच नसल्याने महिलांची खूप अडचण होत असून या सर्व प्रकारांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे महानगरपालिके बाहेर आज आम आदमी पक्षाच्या वतीने स्वच्छता आंदोलन करण्यात आले.सतीश यादव,अक्षय शिंदे,अमित मस्के, किरण कद्रे,ॲड.अमोल काळे, निलेश वांजळे,निरंजन अडागळे,किरण कांबळे, उमेश बागडे, प्रशांत कांबळे, सुरेखा भोसले, शितल कांडेलकर सुरज सोनवणे, गणेश थरकुडे, शिवराम ठोंबरे, नौशाद अन्सारी, निखिल खंदारे,अविनाश केंदळे,सुनील सवदी,अविनाश भाकरे ,मिलिंद ओव्हळ, ॲड.गुणाजी मोरे,कुमार धोंगडे,अजिंक्य शेडगे, संदीप सूर्यवंशी अविनाश भाकरे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी शहरातील स्वच्छतागृहांची महापालिकेने व्यवस्थित स्वच्छता करावी या मागणी करिता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना भेटून फिनेल देण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांची भेट घेण्यापासून सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे कार्यकर्त्यांनी सोबत आणलेले फिनेल पुणे महानगरपालिकेसमोरील रस्त्यावर ओतून आंदोलन केले. पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर बंद असलेली स्वच्छतागृहे सुरू नाही केली, तसेच स्वच्छतागृहांची स्वच्छता नीट ठेवली गेली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलने शहरात केली जातील अशी चेतावणी यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आली.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांचे लाड बंद करावेत. लवकरात लवकर पुणे शहरातील सर्व टॉयलेट स्वच्छ करावी. आणि ती नियमित स्वच्छ ठेवावित–धनंजय बेनकर आप शहराध्यक्ष पुणे
भारतीय जनता पार्टी ने स्वच्छ्ता गृह सफाई टेंडर मध्ये पण भ्रष्टाचार केला आहे. महिलांसाठी अत्यावश्यक असलेल्या सुविधा मध्येही भ्रष्टाचार करणे म्हणजे सर्व पातळ्या ओलांडल्या आहेत. स्वच्छ्ता गृह सफाई टेंडर ची चौकशी व्हावी, दोषिवर कारवाई करावी आणि स्वच्छ्ता गृह नियमित सफाई करावे, रिपेअर करावेत. अन्यथा आंदोलन उग्र पद्धतीने केले जाईल आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाईल.– आप पुणे शहराध्यक्ष श्री सुदर्शन जगदाळे
ई टॉयलेट, अस्पिरेशनल टॉयलेट नावाचे दिखावू पांढरे हत्ती जोपासण्यापेक्षा साधे, सुलभ आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृह ही पुणेकरांची गरज आहे. महिलांच्या आरोग्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षित स्वच्छ्तागृह हवीत.- मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आप