
बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन शहरातील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर शनिवारी 29 जूनच्या रात्री वर्ल्ड कप जिंकून रोहित शर्माने भारतीय चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे.रोहित शर्माच्या टीमने ते स्वप्न पूर्ण केले जे 11 वर्षांपासून पूर्ण होण्याची वाट पाहत होते. दक्षिण आफ्रिकेने 177 धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. पण,दक्षिण आफ्रिकेच्या हातून विजय हिसकावून घेतला. टी-20 विश्वचषक भारताचा आहे. विजयाचा नायक फक्त एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय संघ आहे. सूर्यकुमारचा तो झेल अनेक दशके लक्षात राहील, त्यामुळे मिलर पॅव्हेलियनमध्ये परतला.अजिंक्य भारत, विराट विजय, हार्दिक अभिनंदन:टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवले.भारताने बार्बाडोसच्या स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यांच्या विकेट पॉवरप्लेमध्ये पडल्या. कोहलीने 72 धावांची तर अक्षर पटेलने 47 धावांची खेळी खेळली. शिवम दुबेने वेगवान 27 धावा करत धावसंख्या 176 पर्यंत नेली. दक्षिण आफ्रिकेचे फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि एनरिक नॉर्किया यांनी 2-2 बळी घेतले. कागिसो रबाडा आणि मार्को जॅन्सन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 169 धावा करू शकला. हार्दिक पंड्याने 3 बळी घेतले. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंगने 2-2 विकेट घेतल्या. हेनरिक क्लासेनने 27 चेंडूत 52 धावा केल्या तर डी कॉकने 31 चेंडूत 39 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने 21 चेंडूत 31 आणि मिलरने 17 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले.गेल्या 11 वर्षांपासून केवळ भारतीय क्रिकेट संघ किंवा बीसीसीआयच नाही तर 130 कोटींहून अधिक लोक ट्रॉफीच्या वाट पाहत होते.
इतर सर्वांसाठी ही प्रतीक्षा गेल्या 11 वर्षांपासून असली तरी टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविडसाठी ही प्रतीक्षा 17 वर्षांची आहे. खेळाडू म्हणून 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 10 वर्षांनंतर द्रविड 2021 मध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये परतला पण एका नव्या भूमिकेत. कोच म्हणून संघांशी जोडल्यानंतर भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्याचे ओझे त्याच्यावर होते. आणि गेल्या वर्षभरात तो दोनदा त्याच्या जवळ आला होता.
पण दोन्ही वेळा त्याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप 2023. 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2003 मध्ये द्रविड संघांचा उपकर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजेतेपद जिंकण्यापासून रोखले होते.