भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘स्वर मोहिनी ‘ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना उजाळा देणारा हा कार्यक्रम आसावरी चितळे यांनी प्रस्तुत केला.हा कार्यक्रम शनीवार,दि.२९ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला. या कार्यक्रमाचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात माय भवानी या गीताने झाली.मोगरा फुलला, रुणु झुणु, भय इथले संपत नाही, चाफा बोलेना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, तिन्हीसांजा सखे , असा बेभान हा वारा , ही गीते सौ.आसावरी चितळे,सौ.पद्मजा गोडसे यांनी सादर केली. त्याचबरोबर संगीतकार आनंदघन यांच्या निळ्या आभाळी, ऐरणीच्या देवा, वाट पाहूनी, बाई बाई मनमोराचा, रेशमाच्या रेघांनी, मराठी पाऊल या गीतांची मेडले सादर केली. यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेली काही हिंदी गाणी सादर करण्यात आली. यामधे ज्योती कलश , मेघा छाए, बैय्या ना धरो, तेरी आँखो के सिवा, ओ सजना , रहे ना रहे हम या गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.सौ.माधुरी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.नरेंद्र चिपळूणकर,केदार परांजपे,राजेंद्र हसबनीस , विनोद सोनावणे यांनी साथसंगत केली.
.रसिकांना हा कार्यक्रम विनामूल्य खुला होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१५ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा प्रशस्तिपत्रक आणि ज्ञानेश्वरीची प्रत देऊन सत्कार केला.