पुणे: शहरातील वानवडी परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने आज सकाळी टँकर चालवून अनेकांना धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टँकरने सकाळी व्यायामासाठी निघालेल्या काही मुलांना धडक दिली आहे.शिवाय, टँकरने एका टू-व्हिलरला उडवलं आहे. पुण्यात अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना गाजत असतानाच हा प्रकार घडला आहे.दुचाकीवरून महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले.शहरातील वानवाडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे