महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सलग कारवाईचे सत्र सुरुच, ६४ हजार ५४५ चौरस फुट बेकायदा बांधकाम पाडले
पुणे: महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून हॉटेल पब, रेस्टॉरंट, बारच्या बेकायदा बेकायदा बांधकाम पाडण्याचे सत्र सुरु केले आहे. शुक्रवारी हपसर भागासह मंहमदवाडीतील बार व बेकरी, माऊंटन हाय, गार्लीक हॉटेलसह इतर हॉटेलचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. एकूण ६४ हजार ५४५ चौरस फुट इतके बांधकाम पाडण्यात आले. पुण्यात ड्रग्ज पार्टी रंगल्यानंतर शहरातील बेकायदा पब, बार, रेस्टॉरंटवरील थंडावलेल्या कारवाईला पुन्हा एकदा जोर आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील बेकायदा पब, बार, रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्याची धडक कारवाई सुरु आहे. एफ सी रस्त्यासह शहरातील तब्बल २६ ठिकाणांवरील पब, बार, रेस्टॉरंटवर धकड कारवाई केली. हे कारवाईचे सत्र सुरु ठेवत शहरातील १९ अस्थापनांचे बेकायदा ५६,०६१ चौरस फुट इतके बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. यामध्ये बाणेर भागातील एस्को बारचे ८ हजार चौरस फुट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले. त्यानंतर म्हात्रे पूल, राजाराम पूल, जवळील नदी पात्रातील डीपी रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर शुक्रवारी हडपसर भागात महापालिकेने कारवाई केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आणि पुणे पोलिसांना शहरातील अनधिकृत पब, बारवर धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून धडक कारवाई केली जात असून बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले जात आहे. तसेच त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, यासाठी तक्रार अर्ज दाखल केला जात आहे.
या ठिकाणी केली कारवाई..
१) हडपसर ( जुनी हद्द )- कल्ट बार , कड वस्ती, 10,000 चौ. फुट
२) मंहमदवाडी -बार व बेकरी 1000 चौ. फुट
३) मंहमदवाडी- गार्लीक हॉटेल 900 चौ. फुट
४) मंहमदवाडी – हायलॅन्ड बार 1500 चौ. फुट
५) मंहमदवाडी- माऊंटन हाय 8500 चौ. फुट
६) मंहमदवाडी हॉटेल- तत्व 6100 चौ. फुट
७) उंड्री फ्युजन ढाबा – 4000 चौ. फुट
८) उंड्री सनराईज कॅफ – 3000 चौ. फुट
९) भवानी पेठ शेड बांधकाम 1345 चौ.फुट
१०) फुरसुगी आर सीसी बांधकाम 720 चौ. फुट
११) रविवार पेठ व गणेश पेठ आर सीसी बांधकाम 2080 चौ. फुट
१२) वारजे आर सीसी बांधकाम 4400 चौ. फुट
१३) राजाराम पुल ते म्हात्रे पुल पत्राशेड 21000 चौ. फुट
एकूण 64545 चौ. फुट.