माहिती अधिकारात झाले उघड–त्यांना घालण्यात आलेल्या पहा अटी
पुणे:पुणे शहर आणि त्याच्या परिसरात अनेक वर्षांपासून शेकडो पब आणि डिस्को कार्यरत आहेत, परंतु यापैकी बहुतेक आस्थापनांना पोलीस प्राधिकरणांकडून आवश्यक परवाने मिळालेले नाहीत. माहिती अधिकारात एड.समीर शेख यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, यापैकी फक्त २३ पब आणि डिस्कोना आवश्यक परवाने मिळाले आहेत, आणि त्यापैकी एक परवानगी रद्द देखील करण्यात आली आहे.
पुणे पोलीसांनी माहिती कायद्या अंतर्गत अॅड. समीर शेख यांच्या अर्जावर उत्तर देताना , २३ अधिकृत पब आणि डिस्को यांची यादी दिली आहे ज्यातील एक रद्द देखील झालेली आहे . असे असताना सार्वजनिक सुरक्षा कायम ठेवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या आस्थापनांच्या नियमनासाठी अधिक कठोर प्रयत्नांची आणि इच्छाशक्तीची गरज असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
कायमचे बंद करण्याची मागणी
नागरिकांच्या वतीने अॅड. समीर शेख यातील अनधिकृत धंदे कायमचे बंद करण्याची आणि पुन्हा उघडण्याची परवानगी न देण्याची मागणी करत आहेत. अलीकडील होत असलेली कारवाई हे एक चांगले पाऊल आहे, परंतु प्राधिकरणांनी वेळेवर कारवाई करणे आणि या अनधिकृत धंद्यांना कायद्याचे उल्लंघन करण्यापासून रोखणे आवश्यक आहे. सामान्य जनतेला त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे आणि यंत्रणा कायदा लागू करण्यात आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कटिबद्ध आहेत हे त्यांनी कृतिद्वारे दाखवून देणे गरजेचे आहे .
पोलीसांनी अलीकडील कारवाई, जसे मध्यरात्री दीड वाजता बंद करण्याची कठोरता आणि मद्यपान रोखण्यासाठी श्वास विश्लेषकाचा वापर, हे सकारात्मक पाऊल आहेत. परंतु हे प्रयत्न सातत्याने चालू राहिले पाहिजे आणि यंत्रणा कायदा लागू करण्यात आणि अवैध स्थापनांचे थोड्या दिवसात पुन्हा उघडणे टाळण्यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे.
कल्याणीनगर अपघाती दुर्घटनेनंतर, पोलीस आणि नगरपालिका प्राधिकरणांनी अवैध पब आणि डिस्को बंद करण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. ही घटना प्रश्न उभे करते की काही व्यावसायिक मालकांनी आश्चर्यकारक पद्धतीने कायद्याचे उल्लंघन केले आहे आणि यंत्रणांना अज्ञात कारणाने वेळेवर कारवाई करण्यात अपयश आले आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे की एक छोटा दुकानदार किंवा हातगाडी व्यावसायिक देखील परवान्या शिवाय व्यवसाय करू शकत नाही, त्याच वेळी हे मोठे पब आणि बार कुठल्याही परवान्याशिवाय बिनधास्त उघडपणे चालू शकतात, आणि यंत्रणा वेळेवर कारवाईच काय तर पाहणी देखील करत नाहीत ,असे एड.समीर शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हे ते २३ पब आणि त्यांचे पत्ते व परवानाधारक यांची नावे
1)हाय स्पिरीट कॅफे, स.नं. ३५/ए/१, घोरपडी पेठ पुणे-खोदादाद रुस्तुम इराणी
२)पंचशिल ईन्फ्रास्ट्रक्चर होल्डींग प्रा. लि. हॉटेल मेरियेट सुट स.नं.८१ प्लॉट नं.४ ए.बी.सी. रोड मुंढवा पुणे-अतुल चोरडिया व सागर चोरडिया
३)आयसीसी रियालिटी इंडिया प्रा.लि. हॉटेल जे डब्ल्यु मेरियट स.नं.९८५ एफपी नं.४०३ एस.बी. रोड शिवाजीनगर पुणे-अतुल चोरडिया
4)क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. चे हॉटेल द वेस्टीन स.नं.३६/३/व कोरेगाव पार्क अॅनेक्स, मुंढवा रोड घोरपडी पुणे-सागर चोरडिया श्री. जुझेर सोयव लतीफ
5)ग्रॅव्हिटी लाईफस्टाईल रेस्टॉरंट एबीसी रोड कोरेगाव पार्क पुणे-सौ. गांधाली मिहीर कुलकर्णी
6)ग्रॅडयुअर हॉटेल प्रा.लि. कं. अंतर्गत हॉटेल कोको स.नं.३७/०३ अॅनिक्स टॉवर १२ व १३ वा मजला ए.बी.सी. रोड मुंढवा पुणे-कुणाल प्रकाश म्हस्के
7)मे. हॉटेल मायरा हॉस्पीटॅलिटी एलएलपी या नावाने टूबिएचके शेड नं.०७ फायनल प्लॉट नं.१००/१-१ राजा बहादुर मिल संगमवाडी पुणे-हेरंब आनंदराव शेळके
8)मे. हॉटेल इव्हेंटेंस्टिक हॉस्पीटॅलिटी सर्व्हिसेस एलएलपी अंतर्गत ऑटेल ओरीला स.नं.८१,८२/२६/५ एबीसी रोड रागा लॉन्सजवळ मुंढवा पुणे-राहुल बाळु नवले
9)मे. हॉटेल वॉटर बार ॲन्ड किचन या नावाने स.नं.८१,८२/२६/५ एबीसी रोड, पिरॅमिड कॉम्प्लेक्स मुंढवा पुणे-अमोल चंद्रकांत शिनलकर (२५)
१०)मे. हॉटेल वनबीचके सुपरबार (प्लोन्टोस व्हेनचर्स प्रायव्हेट लिमिटेड) शॉप नं. सी २-३/४
विंग-जी सर्वे नं.१०७ इमीरस बिल्डींग डी-मार्ट जवळ बाणेर पुणे-अर्जदार हेरंब आनंदराव शेळके
११)मे. हॉटेल दख्खन हॉस्पीटॅलिटी सर्व्हिसेस प्लॉट नं.१०३ बी-बिल्डींग अमित अस्टोनिया,रॉयल स.नं.६२/६३ आंबेगाव न-हे रोड आंबेगाव बु. पुणे-गुरुदत्त धोडिराम लामतुरे
१२)मे. हॉटेल इपीक्युरीन फुडस (एलरो) युनिट नं.१ बी सेरेब्रम आयटी पार्क बिल्डींग बी ३/८ वा मजला कल्याणीनगर येरवडा पुणे-संदिप हर्षवर्धन सहस्त्रबुध्दे
1३)मे हॉटेल सेव्हन सेज हॉस्पीटॅलिटी शेड नं.१ फायनल प्लॉट नं.१००/१/१राजाबहादुर रोड संगमवाडी पुणे-सिध्दांत संतोष धुवाळी
1४)मे. न्यु एज हॉस्पिटॅलिटी हॉटेल कोरा, २५/१ ए तळमजला मार्वल अलिना कोरेगाव पार्क पुणे-अमन प्रेम तलरेजा
१५)में ट्रिलीयम सिक्युरिटीज प्रा.लि. हॉटेल कोझी एबीसी रोड, मुंढवा पुणे-नमन प्रल्हाद भुतडा
१६)मे. ट्रेस कॉमास हॉस्पिटॅलिटी (मिलर्स द लइकरी क्लब एलएलपी) युनिट नं.२/३ स नं.५
राजा बहादुर मिल रोड संगमवाडी पुणे- गिरीष सत्यनारायण कचोलिया
१७)मे एक्स्ट्रा वेगेंझा हॉस्पिटॅलिटी युनिट नं ४/५ स.नं.०५ प्लॉट नं.१००/१०१ राजा बहादुर मिल रोड संगमवाडी पुणे-अनुज विनोदकुमार अगरवाल
१८)मे जोकर हॉस्पीटॅलिटी स नं.२३ हि नं.०७ शॉप नं. १७०८ बालेवाडी हायस्ट्रीट समोर बाणेर पुणे-सिध्दार्थ राजेंद्र काळोखे
१९)मे. इस्काफिजम हॉस्पीटॅलिटी एलएलपी स.नं.१६/१ रेस्टॉरंट ४ तळमजला मेझानाईन फ्लोअर मुळीक पॅलेस नं.२ कल्यणीनगर पुणे-अरविंद लालचंद यादव
२०)मे हॉटेल शेरेटॉन ग्रॅड पुणे न्युव्हो १००/१०१ राजा बहादुर मिल रोड पुणे-करण विनोदकुमार अग्रवाल
२१)मे एक्का आयव्हीआय हॉस्पीटॅलिटी एलएलपी स.नं.२३/७/१ ऑप आयरिस सोसायटी वालेवाडी हायस्ट्रीट समोर बालेवाडी पुणे-४५
– स्वप्नील अशोक पाटील
२२)मे. एलिफंट अॅण्ड कंपनी विलेनिअर ब्रदर्स साई हेरिटेज तळमजला स.नं.१३१ बाणेर पुणे
–अनुज प्रदीप सोळंकी
२३)मे कोस्टल कल्चर स.नं.१२८/०१ राम इन्डों पार्क बाणेर पुणे
-अमित भाऊसाहेब शिंदे व पंकज दत्तात्रय बिरादार
या अटींवर परवाना देणेत आला आहे.
१. कार्यक्रम परवान्यासाठी विविध प्राधिका-यांनी दिलेल्या ना-हरकत पत्रात दिलेल्या अटी शर्तीचे पालन करावे.
२. पार्किंग तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
३. कोणत्याही धार्मिक/जातीय भावना दुखावल्या जातील अशा आक्षेपार्ह प्रतिमांचे प्रदर्शन, घोषणा देणे किंवा वाद्य वाजविणे, अश्लील नृत्य, हावभाव करणे किंवा तत्सम प्रकार करु नये.
४. कार्यक्रमाची वेळ सकाळी ११.३० ते ०१.३० (रात्रौ ०१.३० पर्यंत) (महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा व कामगार विभाग अधिसूचना दिनांक १९/१२/२०१७ अन्वये)
५. सदर आस्थापनेसाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील नियम व सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रमांना परवाना देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे यासाठीचे नियम-१९६० व सुधारित नियम-१९८८ व २००३ हे लागु होत असुन तसेच अधिसूचना २०१७ (महाराष्ट्र राजपत्र दि ३ जुलै २०१७), महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंटस् अॅक्ट २०१७ आणि आवाजाचे मर्यादेबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे तसेच ध्वनीप्रदुषण अधिनियम २००० व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अन्वये सदरच्या नियमावलींचे पालन करणे आपणावर बंधनकारक आहे. ६. सदरच्या अनुज्ञप्तीचे वेळोवेळी नुतनीकरण करुण घेणे आवश्यक आहे.
७. सदर ठिकाणी परदेशी कलाकारांचा कार्यक्रम करण्यापुर्वी नियमाप्रमाणे महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांची रितसर परवानगी घ्यावी.

