पुणे–: सेंच्युरी टेक्सटाइल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेडची 100% पूर्ण मालकीची उपकंपनी आणि आदित्य बिर्ला समूहाचा रिअल इस्टेट उपक्रम बिर्ला इस्टेट प्रा. लिमिटेड पुण्यातील मांजरी येथे भूसंपादन करून पुण्यात आपले स्थान विस्तारण्यासाठी सज्ज आहे. ही जमीन 16.5 एकरमध्ये पसरलेली असून अंदाजे ३२ लाख चौरस फूट विकास क्षमता आणि २५०० कोटी रु. ची महसूल क्षमता आहे.
एकात्मिक टाउनशिपचा एक भाग म्हणून प्रस्तावित विकासकाम विविध निवासी युनिट संच सादर करेल. पुण्याच्या वेगाने विकसित होत असलेल्या मायक्रो मार्केट मांजरी मध्ये स्थित हा प्रकल्प पुणे-सोलापूर महामार्गावर असून खराडी, मगरपट्टा आणि फुरसुंगी तसेच हडपसर एमआयडीसी सह अनेक आयटी हबशी अखंड दळणवळण सेवा पुरवितो.
या विकासकामाबाबत बोलताना बिर्ला इस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के. टी. जितेंद्रन म्हणाले, “पुणे ही आमच्यासाठी एक धोरणात्मक बाजारपेठ आहे आणि हे संपादन आमच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांच्या दिशेने एक पाऊल आहे. पुणे सोलापूर कॉरिडॉर वेगाने बदलत आहे आणि आम्ही विचारपूर्वक निवडलेल्या सुविधांसह समकालीन वास्तूकलेला अखंडपणे एकत्रित करणारी, काळजीपूर्वक डिझाइन केलेली घरे वितरीत करून मांजरीमध्ये जीवनमान उंचावण्याचा आमचा मानस आहे.”
शिवाय, हा प्रकल्प शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा आणि शॉपिंग सेंटर्सशी सोयीस्करपणे जोडलेला आहे. त्यामुळे हा प्रकल्प एक फायदेशीर गुंतवणूक संधी बनत आहे. पुणे रिंगरोडशी उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे हा भाग लक्षणीय वाढीसाठी सज्ज आहे.