पुणे-
पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलेय. एफसी रोडवरील एका हॉटेलमधील व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले.
व्हिडीओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतेय. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायचं, त्याची आता ओळख बदलली जातेय का?, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावरून कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी राज्यसरकारवर विशेषत: राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यावरच थेट आरोप केला. त्यावरून शंभुराज देसाई यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावर सातत्याने भूमिका मांडतेय. त्याही वेळेला जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे आढळायला लागले, तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले. पण शंभूराज देसाई आरेरावीने बोलतात, त्यांना मला खास प्रश्न विचारायचाय, हप्ता भरपूर मिळाला की आम्ही तरुणांच्या जीवनशी सुद्धा त्यांना खेळायचे. या सगळ्या प्रकरणांमध्ये शंभूराजे यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय शंभूराजे देसाई यांच्यासाठी फक्त काम करणारे राजपूत यांचं निलंबन झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्याशिवाय पुणे सुधारू शकत नाही. महाराष्ट्रातील ड्रग्जचा विळखा त्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
व्हिडिओ कुठला, चौकशी केली जाईल
याप्रकरणी आम्ही पोलिस आणि आमच्या खात्यासंदर्भात चौकशी करु. कल्याणीनगर प्रकरणानंतर आम्ही सर्व हॉटेल आणि पब यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यत जवळपास 60 जणांवर कारवाई केली. हा व्हिडिओ कुठल्या भागातील आहे, त्याची आम्ही चौकशी करणार आहे. 49 बार आणि पब बंद केलेली अजून सुरु केलेली नाहीत, असे शंभूराज देसाई म्हणाले. याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येईल, ज्या परिसरातील हॉटेलमध्ये हे घडलेय त्याबाबत कसून चौकशी करण्यात येईल, असेही देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
रवींद्र धंगेकर काय म्हणाले ?
या प्रकरणाचा पाठपुरावा मी गेल्या काही दिवसांपासून घेत आहे. पोलिस आणि इतरांशी माझं पत्रव्यवहार आणि बोलणं झालं. पोलिस पथकातील काही अधिकार्यांमुळे या घटना घडत आहेत. पोलिसांना पैसे देऊन हा प्रकार होत आहे. यावर कायमचा उपाय शोधायला हवा. तसा कायदा तयार करायला हवा. पोलिसांना पैसे देऊन काही प्रकऱणं मिटवली जातात. पुन्हा तेच सुरु होतं. कायदा आहे, पण पोलिस त्याचा वापर करत नाहीत, पैशांचा हप्ता घेऊन सर्व काही सुरु आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांचे आडनाव देसाई चुकून झालं, त्यांचं अडनाव खाटीक असायलं हवा. त्यांच्यावर आरोप केल्यावर हक्कभंग आणणार असल्याचे ते म्हणतात, असाही आरोप धंगेकर यांनी केला.