पुणे -पूर्व वैमनस्यातून रायकर मळ्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या २ साथीदारांच्या मदतीने सिंहगड रस्त्यावर अभिरुची मॉल जवळ गोयल गंगा खाऊ गल्लीत फायरिंग केल्याची घटना काल सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान घडली सुदैवाने गोळ्या दुसरीकडे फायर झाल्याने तो अल्पवयीन मुलगा थोडक्यात बचावला आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अभिरुची मॉल जवळ असलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ घडली.घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंहगड रस्ता परिसरातील एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर दोन अल्पवयीन मुले बसली होती. दरम्यान सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तीन तरूणांनी तिथे येऊन यातील एका अल्पवयीन मुलावर गोळ्या झाडल्या. सुदैवाने त्या अल्पवयीन मुलाने मान खाली केल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. त्यांनतर ते हल्लेखोर तिथून पसार झाल्याची माहिती त्या अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितली आहे.घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभारआदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव मोबाईल नंबर ८७८८८३१६१० याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
अल्पवयीन मुलांच्या टोळ्यात एकावर गोळीबार-सिंहगड रस्त्यावर वॉर
Date:

