पक्षाने कात टाकली पाहिजे, पण जेव्हा नवीन कात आकार धरू लागते तेव्हाच हा बदल आपोआप घडून येतो,आणि पक्षांना नवे चेहरे सहजपणे प्राप्त होतात.पण नव्यांची क्षमता नसताना काम करणाऱ्या प्रस्थापित आणि पक्षांचा चेहरा बनलेल्या नेत्यांना केवळ फलकबाजी करून हटवून दबाव टाकण्याचे राजकारण पक्षाचे नामोनिशान तर मिटवू पाहत नाही ना ? याचा विचार व्हायला हवा.कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात चालविलेली मोहीम ही क्षमता नसलेल्या तरुणाईच्या हाती पक्ष सोपवा तर सांगत नाही ना ? असा प्रश्न या कार्यकर्त्याने फलकबाजी करूनच उपस्थित केला आहे, या विषयावर हा उहापोह…
पुण्याचे काँग्रेस भवन हे महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे खिदमतंगारोका घर बने..अशी इच्छा अजूनही अनेकांची असणे साहजिक आहे.आणि इथून अनेक छोटे छोटे कार्यकर्ते बडे नेते बनलेत. पण दुदैव असे कि काहींनी मोठे होताच पक्षाकडे पाठ फिरविली. काहींनी पक्षाचा वापर निव्वळ स्वतःसाठी करवून घेतला. आणि बाजूला झाले. आणि काही भ्रष्टाचाराच्या फेऱ्यात अडकून नामशेष झाले. जेव्हा काँग्रेस भवन खिदमतंगारोका घर होते तेव्हा अशा खिदमतंगारोची काही जबाबदारी बनते. जिथून आपण घडलो,मोठे झालो त्यास संकटाच्या काळात,किंवा अन्य कधीही आपले झाले आता काय करायचे? या अर्थाने वाऱ्यावर सोडून जायचे नसते.पण काहींना रेशन दुकाने, दारूची दुकाने,ठेकेदाराची परवाने मिळताच अशा कार्यकर्त्यांनी या घराला वाऱ्यावर सोडून दिले..आणि निष्ठावंत म्हणूनच निव्वळ मिरवीत राहून त्यानंतरही पक्षापासून काय फायदा होतो त्याकडे लक्ष ठेवून राहिले.
हि बाब या घटनेपासून वेगळी असली तरी तीही एक काहीशा प्रमाणात दिसलेली काँग्रेसची बाजू आहे हे नाकारता येणार नाही. आता घटना अशी आहे कि,’संबंधित कार्यकर्त्याने जो जुना आहे. सारा इतिहास जाणून आहे . अशा कार्यकर्त्याला त्याच त्याच नावाच्या नेत्यांची जणू घृणा वाटू लागली कि असूया वाटू लागली कि तिरस्कार वाटू लागला कोण जाणो,पण या कार्यकर्त्याने जो फलक काळ आणला त्यावर काँग्रेसच्या ८० टक्के अशा नेत्यांची नावे होती ज्यांनी काँग्रेस साठीच हयात घालविली. अर्थात त्यांनी काँग्रेस साठी काही केले आणि काँग्रेस ने त्यांना काही दिले हे तेवढेच सत्य आहे. पण या कार्यकर्त्याने फलकावर लावलेली नावे पहिली तर अचंबित होण्याची वेळ मतदारानावर आणि जनतेवर निश्चित येईल यात शंका नाही.का नाही ? ते हि पहा..या कार्यकर्त्याने फलकावर नावे दिलीत ती उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर,मोहन जोशी, रमेश बागवे,अभय छाजेड,दीप्ती चौधरी,कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड,आणि संजय बालगुडे यांची. आणि म्हटले काय..आता तरी यांच्यात बदल होणार आहे काय ?
कार्यकर्त्याची दिशा योग्यच आहे. जुनी खोंडे बाजूला सारली पाहिजेत नवीन खोंडांना उधळू दिले पाहिजे काही हरकत नाही. पण हि जी नावे आहेत हि जर सारी बाजूला केली तर पुण्याच्या काँग्रेस मध्ये काय उरेल ? पुण्याच्या काँग्रेसचा चेहरा कसा असेल ? याचा नको का विचार व्हाल ? बरे ज्यांनी हि नावे सुचवलीत, त्यांचे पक्षात कित्येक वर्षांपासून अस्तित्व असताना त्यांनाही पक्षात काम करण्याची संधी असताना त्यांनी पक्षासाठी दिलेले योगदान जनतेला,मतदारांना सोडा काँग्रेस भवनातील किती लोकांना ठाऊक आहे. हा कार्यकर्ता स्वतःला डॉ पतंगराव कदमांचा मानसपुत्र सांगतो ,मग याने भरती हॉस्पिटल, भरती विद्यापीठ आणि दक्षिण पुण्यात काँग्रेसचा प्रसार,किती केला किती कार्यकर्त्यांची संख्या वाढविली यावर येथे विचार करण्याची गरज नाही.पण आता तरी यांच्यात बदल होणार आहे काय ?असा प्रश्न फलकबाजीने उपस्थित करण्या अगोदर हा बदल जर करायचा म्हटले तर या बदलाची जागा कोणते युवा नेते भरून काढणार आहेत ? याचा प्रश्न उपस्थित होऊ शकणार नाही काय ? जर नवीन कात अजून येण्याची शकयता जिथे दिसत नाही तिथे जुनी कात टाकण्याचे षडयंत्र आत्मघातकीपणाचे वाटत नाही काय ? अगदी नाना वाबळे यांच्यापासून कार्यकरकर्ता असलेल्या जुन्या कार्यकर्त्याला हे सांगणे लागू नये.आणि पतंगराव कदमांच्या नंतर विश्वजित कदमांना लोकसभेची संधी याच पक्षाने दिली होती.पण भारती विद्यापीठ,आणि भारती हॉस्पिटल यांचे पुण्यातील जनतेशी असलेले संबंध, स्वतः विश्व्जीत कदमांनी राहुल गांधी पुण्यात येऊनही त्यांना पुणेकरांच्या समोर तर सोडा,काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या समोर तरी आणले काय ? अशा अनेक प्रश्न्न कार्यकर्त्यांनी उत्तरे द्यायला नको काय ?
बरे संबंधित जुन्या जाणत्या कार्यकर्त्याने ज्या नेत्यांना टार्गेट करत फलकबाजी सुरु ठेवली आहे त्या नेत्यांच्या पुढे आपण त्यांच्या एवढे कार्यक्षम आहोत असेही कधी दाखवून दिलेले आहे काय ?तेव्हा ज्येष्ठ नेत्यांच्या हातून सूत्रे काढून घेताना अगोदर ती सांभाळता येतील असे बळकट हात निर्मण होणे गरजेचे असते हे अगदी साधे सूत्र आहे.जोपर्यंत असे बळकट हात निर्माण होत नाहीत तोवर अशा ज्येष्ठांना कार्यकर्त्यांच्या समूहाची धुरा खांद्यावर घ्यावी लागते .तेव्हा अशी धुरा खांद्यावर घेतील असे पर्याय निर्माण केल्यावर बदलाची अपेक्षा ठेवणे योग्य राहील. अन्यथा हे पक्ष संपविण्याचेच एक षडयंत्र मानले जाईल याची तमा बाळगलेली बारी नाही का ? या प्रश्नाचा विचार केलेला बरा.
आता पहिला भाग राहतो तो एक ज्येष्ठ नेते भाजपच्या नेत्यांना नागपुरात जाऊन भेटले आणि त्याबाबत याच पतंगरावांच्या मानसपुत्राने त्यांच्या विरोधातही फलकबाजी केल्याचा…
पुण्यात फलकबाजी लोकांना फारच स्वस्तात,जास्त प्रसिद्धी देणारी बाब जशी आहे तशी योग्य भावनांना वाचा फोडणारीही बनली आहे हेही नाकारता येणार नाही.
तेव्हा ज्येष्ठ नेत्यांच्या हातून सूत्रे काढून घेताना अगोदर ती सांभाळता येतील असे बळकट हात निर्मण होणे गरजेचे असते हे अगदी साधे सूत्र आहे.जोपर्यंत असे बळकट हात निर्माण होत नाहीत तोवर अशा ज्येष्ठांना कार्यकर्त्यांच्या समूहाची धुरा खांद्यावर घ्यावी लागते.तेव्हा अशी धुरा खांद्यावर घेतील असे पर्याय निर्माण केल्यावर बदलाची अपेक्षा ठेवणे योग्य राहील. अन्यथा हे पक्ष संपविण्याचेच एक षडयंत्र मानले जाईल याची तमा बाळगलेली बारी नाही का ? या प्रश्नाचा विचार केलेला बरा.
आता पहिला भाग राहतो तो एक ज्येष्ठ नेते भाजपच्या नेत्यांना नागपुरात जाऊन भेटले आणि त्याबाबत याच पतंगरावांच्या मानसपुत्राने त्यांच्या विरोधातही फलकबाजी केल्याचा…
पुण्यात फलकबाजी लोकांना फारच स्वस्तात ,जास्त प्रसिद्धी देणारी बाब जशीआहे तशी योग्य भावनांना वाचा फोडणारीही बनली आहे हेही नाकारता येणार नाही.
पण प्रश्न होता तो ज्येष्ठ नेते ज्यांना ४० वर्षे एकाच जागेवर पक्षात काम करण्याची संधी मिळाली, त्यांना कधीही पुढे जाण्याची व्यापक स्वरूपात आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी दिली गेली नाही आणि अगदी नव्याने आलेल्या युवा नेत्याला या ज्येष्ठ नेत्याच्या पुढील उच्च पदावर जाण्याची संधी दिली गेली.साहजिक आहे पक्षातील अशा बाबींना कुरघोड्या मानून..आपणही दबावाची खेळी खेळावी म्हणून हे नेते नागपुरात भाजप नेत्यांना भेटलेही असतील. तो त्यांचा राजकीय व्यूह नीतीचा चुकलेला का होईना भाग होता. पण म्हणून या नेत्याचे पक्षातील ४० वर्षाचे योगदान आणि फलकबाजीने आणलेले उधाण यांची सांगड घालणे योग्य ठरणार आहे काय ? मीडियाला TRP हवा असतो त्याचा फायदा अशी वादळे घेत राहतात.पण म्हणून काम करणाऱ्या,प्रस्थापित आणि पक्षाचा चेहरा बनलेल्या नेत्यांना फलकबाजी करून बाजूला फेकता येणार आहे काय ? कि आत्मचिंतन करून यावर निर्णय करणे, तोडगे काढणे अपेक्षित ठरणार आहे?याचे विचार होणे अपेक्षित नव्हते काय ? कि याविरोधात जाऊन पक्षाचे भक्कम खांब उखडून फेकण्याची खेळी खेळणे गरजेचे होते ? असे अनेकप्रश्न आता विचारता येऊ शकतात .पण यावर आता मंथन होण्या ऐवजी कसब्यात मिळालेला विजय आणि लोकसभेत झालेला पराभव, कसब्यात धंगेकर पॅटर्न यशस्वी झाला आणि लोकसभेत काँग्रेस पॅटर्न पराभूत झाला यास कोण जबाबदार ? यावरील मंथन अधिक जरुरीचे ठरणार आहे.तेही कोणतीही राजकीय खेळी न खेळता केले तरच योग्य ठरणार आहे.तेव्हा अशा मारामाऱ्या करून पक्षाची हानी करण्याऐवजी,उथळ फलकबाजी करून पक्षाची हानी न करता कार्यकर्त्यांनी विधानसभेची पुढची वाट सक्षम पणे चोखाळली पाहिजे.कारण या वाटेवरही काटे आहेत.जिथे जिथे नवे खमक्या नेतृत्व असेल तिथे तिथे त्यांना पुढे आणण्याचे काम कार्यकर्त्यांचेच आहे. आणि ते जोवर केले जात नाही तोवर बदल अपेक्षित ना धरलेला बरा ..हेही तेवढेच खरे….