पुणे : बदलत्या काळाची पाऊले ओळखून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने शुक्रवार पेठेतील शैक्षणिक संकुलात श्री शिवाजी मराठा इंग्लिश मिडियम प्री स्कूल अॅन्ड डे केअर सुरू करण्यात आले आहे. या प्री स्कूलचे उद्घाटन संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात यांच्या हस्ते झाले. या माध्यमातून ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या श्री शिवाजी मराठा संस्थेने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणखी एक आश्वासक पाऊल पुढे टाकले आहे, अशी माहिती अण्णा थोरात यांनी दिली.
प्री स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदिश जेधे, नियामक मंडळाचे अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळाचे अध्यक्ष सुरेशशेठ देसाई, संस्थेच्या कारभारी मंडळाचे व नियामक मंडळाचे सभासद, कमल व्यवहारे, प्रदीप जेधे, प्रदीप उरसळ, महादेव पवार, नंदकिशोर बगाडे, सचिन शिंदे, विलास गव्हाणे, बाळासाहेब गायकवाड त्याचबरोबर संस्थेचे सभासद सुनिल वाल्हेकर, तानाजी घारे, संताजी जेधे, प्रदीप पाटील, शेखर शिंदे, रविंद्र शेडगे तसेच शिक्षण शाखांचे सर्व शाखा प्रमुख यावेळी उपस्थित होते.
अण्णा थोरात म्हणाले, आज इंग्रजी माध्यमातील शिक्षण ही काळाची गरज आहे. इंग्रजी माध्यमातील शाळेचे महत्व व उच्च शिक्षणासाठी इंग्रजीवर आवश्यक असणारे प्रभुत्व लक्षात घेता बहुजन समाजानेही इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण घेणे ही गरज आहे. या दृष्टीने विचार करून संस्थेच्या वतीने प्री स्कूल आणि डे केअर ची सुरुवात करण्यात आली आहे.
माधुरी थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विकास गोगावले यांनी आभार मानले.