पुणे- ब्रेमेन चौकातील हॉलीडे टुर्स ट्रॅव्हल्स कडून ट्रिपच्या नावाने काही जणांची फसवणूक केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिघांची अकरा लाख ७० हजार ७९७ रुपायची फसवणूक केल्याची तक्रार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुतेक्डी येथी एका ३७ वर्षीय नागरिकाकडून जम्मू काश्मीर च्या सहली साठी ७० हजार रुपये लुबाडण्यात आले. तर अन्य दोघांकडून सहलीसाठी ११ लाख ७९७ रुपये घेऊन प्रत्यक्षात ठरलेप्रमाणे सुविधा न देता व ट्रीप आयोजीत न करता विश्वासघात करुन, धमकी देवुन फसवणुक केली.दि.१३/०२/२०२४ रोजी ते अदयाप पर्यंत हॉलीडे टुर्सचे ऑफीस भक्ती प्लाझा, ऑफीस क्रमांक २, बी विंग, ब्रेमेन चौक, औंध, पुणे येथे हा प्रकार घडला. सहा.पो.निरी. बी.आर. झरेकर, मो.नं ७५८८१७००६१ हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत .