डॉ.दिवाकर शंकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार डॉ. प्राणेश येवतीकर यांना प्रदान….
पुणे दि. १६ : पुणे येथे जेष्ठ पशुवैध प्रतिष्ठान यांच्या वतीने गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.दिवाकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार डॉ.प्राणेश येवतीकर यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे हया दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होत्या तर खा.मेधा कुलकर्णी, डॉ. संतोष पंचपोळ, डॉ अविनाश देशमुख, डॉ वझरकर उपस्थित होते.
या समारंभात चारा व पशुखाद्य अंकाचे प्रकाशन करण्यात आले . तसेच उत्कृष्ट पशुवैधक उत्कृष्ट शेळी मेष पशु पालक उत्कृष्ट अध्यापक यांना पुरस्कार देवुन गौरविण्यात आले . डॉ अरुण गोडबेले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ गोऱ्हे यांनी पुरस्कार गौरवार्थी यांनी पशुवैदयकीय क्षेत्रात संशोधन आणि विस्तार करण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यानी केले. या क्षेत्रात काम करणाऱ्या जेष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान संस्थांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. न्युझिलंड वसतीगृह पुर्नविकास तसेच आरे कॉलनीत पशुसंग्रहालय होणे आवश्यक आहे. तसेच पशूंच्या देशी जातीवर संशोधन होणेची गरज असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी आवाहन केले. आज फादर्स दिनानिमित पशुवैद्यकीय क्षेत्रात अध्यापन व संशोधन करणारे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे वडील डॉ दिवाकर शंकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार २०२४ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे विशेष आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. पुरस्कार प्राप्त सर्वाचे डाँ गोऱ्हे त्यांनी अभिनंदन केले .