
पुणे- आज पुण्यात सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रवादी शहर कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले .सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड करण्याची मागणी सर्व प्रथम शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती आज त्यांची निवड झाल्यावर येथे फटाके फोडून ढोल ताशे यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले . आणि सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्रिपद देण्याची हि मागणी केली.सुनेत्रावहिनी राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असल्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत, जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता याच्या जोरावर लोकांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्या नक्कीच सार्थक करतील.असा विश्वास यावेळी दीपक मानकर यांनी व्यक्त केला .
यावेळी माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या कि,राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हीच माझी उर्जा भरपूर बळ देणारी आहे त्याच्या आधारावर ,प्रेमावर मला जर मंत्रिपद मिळाले तर पुण्याचा चेहरा मोहरा मी बदलून टाकेल , जे आजवर झाले नाही असे काम करून दाखवेल फक्त कार्यकर्त्यांच्या कडून मिळालेल्या उर्जेवर मी हे सहज शक्य करून दाखवेल अशी मला खात्री आहे.
सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची राज्यसभेत खासदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सौ सुनेत्रा वहिनींचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी केसरी वाड्यातील मानाच्या गणपतीला आणि टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करून , ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत व जेसीबीतून पुष्पवूष्टी करणायात
आली , तसेच महिलांनी औक्षण करून असंख्य कार्यकर्त्यांच्यागर्दीत त्यांचे व्यासपिठावर जल्लोशात स्वागत करण्यात आले .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी सौ सुनेत्रा वहिनींचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य सत्कार देखील करण्यात आला.

तसेच सदर प्रसंगी सुनेत्रावहीनी यांनी पत्रकारांशी संवाद साधला
पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर व कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांची भाषणे झाली , सदर प्रंसंगी भाजपा शहराघ्यक्ष धिरज धाटे , संदीप खर्डेकर, प्रमोद भानगिरे , मंदार जोशी , बाळासाहेब बोडके , बाबा धुमाळ, सनी मानकर ,जयदेव इसवे, रामदास गाडे, करीमलाला शेख , अतुल जाघव , संगीता बराटे , गौरी जाघव , स्वाती गायकवाड व शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.