प्रतिष्ठित चित्रपट निर्माती एकता आर कपूर आणि महावीर जैन एका परफेक्ट कौटुंबिक मनोरंजनासाठी एकत्र येत असल्याच कळतंय. प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करून दोन पिढीतील अंतर भरून काढण्यासाठी यांचा नवा प्रोजेक्ट तयार होत आहे. एकता कपूरने या कौटुंबिक चित्रपटाच्या ट्रेलरचे थिएटरमध्ये नुकतच अनावरण केल.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाचा खास प्रीमियर झाला होता तेव्हा एकता कपूर आणि महावीर जैन यांनीही ‘चंदू चॅम्पियन’च्या निर्मात्यांना त्याच्या थिएटर रनसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर जोडल्याबद्दल साजिद नाडियादवाला यांचे आभार मानले आहेत.
“हर जनरेशन कुछ कहता है” अस म्हणत एकता चित्रपटाच्या भावपूर्ण संदेशाशी ती कशी जोडली आहे आणि जगभरातील प्रेक्षकांसोबत ही उत्कंठावर्धक कथा शेअर करण्याची संधी तिने स्वीकारली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एकता आर कपूरने तिचे मनोगत व्यक्त करताना म्हटले की हा ” हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे कुटुंबांमधील पिढीतील अंतराचे सुंदर चित्रण आम्ही यातून करणार आहोत संपूर्ण जीवन साजरे करण्याच्या प्रगल्भ दृष्टीकोन यातून आम्ही दाखवणार आहोत ” अस ती म्हणाली !
कौटुंबिक मनोरंजनाचे सार पुन्हा परिभाषित करण्यासाठी आणि सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा अस देखील तिने सांगितल आहे.
चित्रपट निर्माती एकता आर कपूर आणि महावीर जैन एका हृदयस्पर्शी चित्रपटासाठी येणार एकत्र !
Date:

