Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार तुपे उतरले रस्त्यावर

Date:

आमदार चेतन तुपे-हडपसर परिसरात असलेल्या खाजगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्या त्यांचे संचालक, कार्यालयीन सदस्य, बुकिंग करणारे एजंट यांची नुकतीच बैठक घेतली. बैठकीत या सर्वांना शेवाळेवाडी येथील पीएमपीएएलच्या डेपोत आपल्या खाजगी वाहतूक करणाऱ्या बसेस थांबवाव्यात असे स्पष्टपणे सांगितले. ट्रॅव्हल कंपन्या चालकांनी पुणे सोलापूर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य करावे अशी सूचना केली आहे.
शेवाळेवाडी डेपो येथे आवश्यक सुविधा, पोलिसांकडून मिळणारे सहकार्य, पुणे मनपाकडून अपेक्षित मदत यावर या सर्वांशी चर्चा केली . यावेळी पोलीस निरीक्षक मंगला मोढवे मॅडम, पोलीस निरीक्षक खांदे साहेब, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे, डेपो मॅनेजर गायकवाड, डॉ. शंतनु जगदाळे, अमर तुपे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर भागातील भाजी मंडई, गाडीतळ, आकाशवाणी, मगर पट्टा या भागात खासगी ट्रॅव्हल्स बस उभ्या राहात असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना चांगला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे खासगी ट्रॅव्हल्स बसला रस्त्याच्या मधे न थांबता शेवाळेवाडी येथे थांबण्याच्या सूचना देत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. सोलापूर महामार्गावरून हडपसरभागात जड वाहनांची मोठी वाहतूक आहे. त्यात खासगी ट्रॅव्हल्स बस मगरपट्टा ते आकाशवाणीपर्यंत प्रवाशांना सेवा देण्यासाठी भर रस्त्यात बस उभ्या करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यावर पुणे वाहतूक पोलिसांनी पर्याय शोधून खासगी ट्रॅव्हल्स बसचालकांना शेवाळेवाडी येथील पीएमपी प्रशासनाची जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर आता खासगी ट्रॅव्हल्स बस रस्त्यात उभ्या न करता थेट शेवाळेवाडी येथे थांबविण्यात याव्या, अशा सूचना दिल्या जात होत्या. आता या भागात खासगी बस थांबणार नसल्याने वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.

आमदार चेतन तुपे– हडपसर गाव येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांनी जोरदार मेहनत घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांना केले. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसर विधानसभा महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर रस्त्यावरील हडपसर भागात मोठी बाजारपेठ आहे. या बाजार पेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. सोलापूर हायवेलगत मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारेदेखील नागरिकांची गर्दी बघून खरेदीसाठी येतात. त्यामुळे रस्त्यावर वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यात या रस्त्यावरून सोलापूरसह इतर जिल्ह्यात जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे प्रवासी संख्यादेखील चांगलीच असते. या प्रवाशांसाठी या बस रस्त्यावरच थांबत असल्याने वाहतूक कोंडी प्रमाणात होते. त्यामुळे संध्याकाळी सात वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागतात.

आमदार चेतन तुपे -सोलापूर रोड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्व खाजगी बसेस शेवाळेवाडी पी.एम.पी.एल. बस डेपो येथे हलविण्यात येणार आहेत. या जागेचीपे यांनी पाहणी केली. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, सरडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे हे सोबत होते.
पाहणी झाल्यानंतर हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे यांना कॉल करून तिथे आवश्यक असणारे मात्र बंद पडलेले विद्युत खांबाचे प्रकशदिवे सुरू करण्यास सांगितले. व आवश्यक अशा सर्व सुधारणा करण्यास सांगितले. त्या शक्य तितक्या लवकर होतील.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...