Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

देशभरात १ लाख झाडांचे वितरण आणि रोपण करणार

Date:

डेहराडून, ५ जून २०२४ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) ५ जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा संपूर्ण महिना पर्यावरणाशी संबंधित उपक्रम साजरे करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याची सुरुवात सफोसा होंडाडेहराडून (उत्तराखंड) येथे वृक्षारोपण समारंभाने करण्यात आली. यावेळी योगेश माथुर, (संचालकविक्री आणि विपणन)श्री. तदाशी मिशिगे (कार्यकारी समन्वयकग्राहक सेवा) श्री. शिपप्रकाश हिरेमठ (ऑपरेटिंग अधिकारीग्राहक सेवा) त्याचप्रमाणे एचएमएसआयचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण महिना साजरा करताना एचएमएसआय देशाच्या  विविध भागांत १ लाख झाडे लावून प्रेरणादायी आदर्श घालून देत आहे.

एचएमएसआयचे अथोराइड् मेन डीलर्स (एएमडी) मोपत पीयूसी तपासणीग्राहकांना माहितीपत्रकांचे वाटपइन्व्हॉइसेस आणि वाहनांसाठी पर्यावरण जागरूकतेचा प्रसार करणाऱ्या स्टिकर्सचे वाटप अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करून या अभियानात सहभागी होणार आहेत. त्याशिवाय एचएमएसआय वितरक जून महिन्यात डीलरशीपला भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांना झाडे भेट देणार आहेत.

युनायटेड नेशन्स एन्व्हॉरन्मेंट प्रोग्रॅमद्वारे ५ जून रोजी साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरण दिन हा एक वार्षिक उपक्रम असून तो पर्यावरण संर्वधनासाठी सकारात्मक कृती करण्यासाठी प्रेरणा देणाराजगभरात साजरा केला जाणारा दिवस ठरावा असे ध्येय आहे. २०५० पर्यंत कार्बन न्युट्रिलिटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एचएमएसआय बांधील असून ते पर्यावरण दिनाच्या यंदाच्या जमिनीचे पुनरूज्जीवनवाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता या मध्यवर्ती संकल्पनेशी सुसंगत आहे. कंपनी आपल्या दैनंदिन कामाकाजात जमिनीचे पुनरूज्जीवनवाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी जमिनीचे शाश्वत व्यवस्थापन, माती आणि जल संवर्धनपुनरूज्जीवन आणि वनीकरणसमाजाता सहभाग आणि शिक्षणधोरण आणि प्रशासन अशाप्रकारचे उपक्रम राबवत आहे.

एचएमएसआय आपल्या कामकाजाच्या प्रत्येक पातळीवर पर्यावरण जपण्यासाठी काम करत आहे. उत्सर्जन कमी करणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यापासून हरित उत्पादनात गुंतवणूक करण्यापर्यंत विविध ठिकाणी एचएमएसआय शाश्वत भविष्यासाठी योगदान देत आहे. एचएमएसआयचा नरसापूर (बेंगळुरू) येथील तिसरा कारखाना आपली ९८ टक्के विजेची गरज अक्षय उर्जेतून पूर्ण करतो. एचएमएसआय आपल्या उर्जाविषयक एकूण गरजांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त गरज अक्षय उर्जा स्त्रोतांतून भागवत आहे. एचएमएसआयच्या सर्व कारखान्यांना प्रतिष्ठित ग्रीनको वर्ल्ड क्लास रेटिंग देण्यात आले असून कंपनीने साध्य केलेला प्लॅटिनम आणि प्लॅटिनम प्लस स्तर पर्यावरणाप्रती बांधिलकी दर्शवणारा आहे. जल संवर्धन क्षेत्रातील बांधिलकी दर्शवण्यासाठी एचएमएसआयद्वारे सर्व उत्पादन केद्रांत सांडपाणी सोडण्याचे प्रमाण शून्य आहे. कंपनीने नरसापूर (बेंगळुरू) येथे तिसरे उत्पादन केंद्र सुरू केले असून येथील पाण्याची १०० टक्के गरज पावसाच्या पाण्याद्वारे भागवली केली जाते.

जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याचे ठळक प्रयत्नही केले जात असून कंपनीच्या सर्व कारखान्यांत सौर उर्जेवर चालणारे वॉटर हीटर्स वापरले जातात. पर्यावरणपूरक पद्धतींता अवलंब आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी जपण्याच्या संस्कृतीला चालना देत एचएमएसआय नाविन्यपूर्ण वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत पर्यावरणीय शाश्वतता जपत आहे.एचएमएसआय सर्वांना हरित चळवळीत सहभागी होऊन पर्यावरणावर सकारात्मक परिणाम घडवण्याचे आवाहन करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...