महाराष्ट्रातील विजयी उमेदवार..महाविकास आघाडीला 29, तर महायुतीला 18 जागांवर आघाडी

Date:

मतदारसंघविजयी उमेदवारपराभूत उमेदवार
नागपूरनितीन गडकरी, भाजपविकास ठाकरे, काँग्रेस
चंद्रपूरप्रतिभा धानोरकर, काँग्रेससुधीर मुनगंटीवार, भाजप
गडचिरोली-चिमूरडॉ. नामदेव किरसान, काँग्रेसअशोक नेते, भाजप
परभणीसंजय जाधव, शिवसेना (ठाकरे)महादेव जानकर, रासप
बारामतीसुप्रिया सुळे, एनसीपी (शरद पवार)सुुनेत्रा पवार, एनसीपी (अजित पवार)
पुणेमुरलीधर मोहोळ, भाजपरवींद्र धंगेकर, काँग्रेस
मुंबई साऊथ सेंट्रलअनिल देसाई, शिवसेना, (ठाकरे)राहुल शेवाळे, शिवसेना (शिंदे)
कोल्हापूरशाहू महाराज, काँग्रेससंजय मंडलिक, शिवसेना (शिंदे)
बुलढाणाप्रतापराव जाधव, शिवसेना (शिंदे)प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना (ठाकरे)
शिरूरअमोल कोल्हे, एनसीपी (शरद पवार)शिवाजीराव आढळराव, एनसीपी (अजित पवार)
साताराछत्रपती उदयनराजे भोसलेशशिकांत शिंदे, एनसीपी (शरद पवार)
मुंबई नॉर्थपीयूष गोयल, भाजपभूषण पाटील, काँग्रेस
मुंबई साऊथअरविंद सावंत, शिवसेना (ठाकरे)यामिनी जाधव, शिवसेना (शिंदे)
पालघरडॉ. हेमंत विष्णू सावरा, भाजपभारती कामडी, शिवसेना (ठाकरे)
जळगावस्मिता वाघ, भाजपकरण पवार, शिवसेना (ठाकरे)
भंडारा-गोंदियाडॉ. प्रशांत पडोळे, काँग्रेससुनील मेंढे, भाजप
नाशिकराजाभाऊ वाजे, शिवसेना (ठाकरे)हेमंत गोडसे, शिवसेना (शिंदे)
मुंबई नॉर्थ सेंट्रलवर्षा एकनाथ गायकवाड, काँग्रेसउज्ज्वल निकम, भाजप
कल्याणश्रीकांत शिंदे, शिवसेना (शिंदे)वैशाली दरेकर, शिवसेना (ठाकरे)
ठाणेनरेश म्हस्के, शिवसेना (शिंदे)राजन विचारे, शिवसेना (ठाकरे)
रायगडसुनील तटकरे, एनसीपी (अजित पवार)अनंत गीते, शिवसेना (ठाकरे)
अमरावतीबळवंत वानखेडे, काँग्रेसनवनीत राणा, भाजप
वर्धाअमर काळे, एनसीपी (शरद पवार)रामदास तडस, भाजप
धाराशिवओमराजे निंबाळकर, शिवसेना (ठाकरे)अर्चना पाटील, एनसीपी (अजित पवार)
रत्नागिरी-सिंधुदुर्गनारायण राणे, भाजपविनायक राऊत, शिवसेना (ठाकरे)
अकोलाअनुप धोत्रे, भाजपडॉ. अभय काशिनाथ पाटील, काँग्रेस
जालनाडॉ. कल्याण काळे, काँग्रेसरावसाहेब दानवे, भाजप
संभाजीनगरसंदीपान भुमरे, शिवसेना (शिंदे)चंद्रकांत खैरे, शिवसेना (ठाकरे)
अहमदनगरनीलेश लंके, एनसीपी (शरद पवार)सुजय विखे-पाटील, भाजप
रावेररक्षा खडसे, भाजपश्रीराम पाटील, एनसीपी (शरद पवार)
मावळश्रीरंग बारणे, शिवसेना (शिंदे)संजोग वाघेरे – पाटील, शिवसेना (ठाकरे)
सोलापूरप्रणिती शिंदे, काँग्रेसराम सातपुते, भाजप
माढाधैर्यशील मोहिते पाटील, एनसीपी (शरद पवार)रणजीत निंबाळकर, भाजप
लातूरडॉ. शिवाजी काळगे, काँग्रेससुधाकर श्रृंगारे, भाजप
हिंगोलीनागेश पाटील आष्टीकर, शिवसेना (ठाकरे)बाबूराव कदम कोहळीकर, शिवसेना (शिंदे)
हातकणंगलेधैर्यशील माने, शिवसेना (शिंदे)सत्यजित पाटील, शिवसेना (ठाकरे)
यवतमाळ-वाशिमसंजय देशमुख, शिवसेना (ठाकरे)राजश्री पाटील, शिवसेना (शिंदे)
शिर्डीभाऊसाहेब वाघचौरे, शिवसेना (ठाकरे)सदाशिव लोखंडे, शिवसेना (शिंदे)
सांगलीविशाल पाटील, अपक्षसंजयकाका पाटील, भाजप
नंदुरबारगोवाल पाडवी, काँग्रेसडॉ. हिना गावित, भाजप
भिवंडीसुरेश म्हात्रे, एनसीपी (शरद पवार)कपिल पाटील, भाजप
दिंडोरीभास्कर भगरे, एनसीपी (शरद पवार)भारती पवार, भाजप
रामटेकश्यामकुमार बर्वे, काँग्रेसराजू पारवे, शिवसेना (शिंदे)
मुंबई नॉर्थ ईस्टसंजय दिना पाटील, शिवसेना (ठाकरे)मिहिर कोटेचा, भाजप
नांदेडवसंतराव चव्हाण, काँग्रेसप्रतापराव चिखलीकर, भाजप

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे, अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव झाला आहे .मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव झाला आहे.

रत्नागिरीत भाजपच्या नारायण राणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत.रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गिते पराभूत झाले आहेत.हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले, त्यांनी ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे, तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झाला आहे.माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर पराभूत झाले आहेत.

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा बहुमताने विजयी झाले आहेत. तर ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचा पराभव झाला आहे.दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे.सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे संजय काका पाटील पराभूत झाले आहेत.नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...