मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील ,अमित शाह,नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी

Date:

 -ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकीत

निवडणुकीनंतर पक्षांतराच्या  घटना मोठ्या प्रमाणावर
पुणे:
२०२४ लोकसभा निवडणुकीच्या मतदान व निकालाच्या वेळेचे ग्रहमान एनडीए आघाडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनुकूल असल्यामुळे एनडीए आघाडी ला ३५० हून अधिक  जागा मिळून नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील ,अमित शाह,नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी आहे,असे भाकीत पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तविले आहे.काँग्रेस पक्षाला ६० ते ८० जागा मिळण्याची शक्यता असून इंडिया आघाडीला १६० ते १८० जागा मिळण्याची शक्यता राहील.
महाराष्ट्रात महायुतीला मागील वेळेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता असून २८ ते ३१ जागा महायुतीला व महाविकास आघाडीला १७ ते २० जागा मिळण्याची शक्यता राहिल,निवडणुकी नंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल संभवतात .देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता असून भाजप चे महाराष्ट्रातील नेतृत्व बदलण्याची शक्यता राहिल .उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या लोकसभेतील सध्याच्या जागा कायम राहतील तर भाजप व शिवसेना(शिंदे गट)यांच्या काही जागा कमी होण्याची शक्यता वाटते,असे सिद्धेश्वर मारटकर यांनी आज सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी पुढील काळात वाढण्याची शक्यता असून पुढील काळात मोठ्या राजकीय व्यक्तीना तुरुंगवास होण्याची शक्यता राहील.महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुढील विधानसभा निवडणुकी पर्यंत गोंधळाचे राहणार असून लोकसभा निवडणुकीनंतर पक्षांतराच्या  घटना मोठ्या प्रमाणावर होतील,असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे. मारटकर यांची अनेक राजकीय भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत. लोकसभा निकाल जवळ आल्याने त्यांनी आपले भाकीत प्रसिद्धीस दिले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...

पुणे पोलीस दलात १७६६ जागांवर भरती सुरु, अर्ज आले १ लाख ३९ हजार

पुणे-पुणे शहर पोलीस दलात १६३३ + १३० पदांसाठीची भरती...