सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्यांचे बिल्डर अग्रवालशी आर्थिक व्यवहार- प्रशांत जगताप यांचा आरोप

Date:

पुणे -सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्यांचे बिल्डर अग्रवालशी आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप करत पुण्यासारखे शांत आणि रम्य शहर यांच्या काळात पब संस्कृती ,ड्रग्ज संस्कृती आणि वाढत्या गुन्हेगारीने बदनाम होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे केला . प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली अशा अनेक बाबींचा निषेध करण्यासाठी “गृहमंत्री जागे व्हा, तिघाडी सरकार जागे व्हा” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले . आणि पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

https://youtu.be/Yz5MsqxVi1o

यावेळी जगताप म्हणाले,’ शहरात नुकत्याच झालेल्या “हिट अँड रन” प्रकरणामुळे आणि हे प्रकरण हाताळत असताना झालेल्या अक्षम्य चुकांमुळे पुणे शहराची संपूर्ण देशात नाचक्की झाली आहे.कधीकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, हिट अँड रन सिटी अशी ओळख असलेले आपले पुणे शहर आता ड्रगचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होत आहे.
कायदा व सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था, पोलिस प्रशासनात अवास्तव राजकीय हस्तक्षेप यामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे.याविरोधात पुणेकरांच्या भावना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हेआंदोलन करण्यात आले.
यावेळी कोयता गँगची दहशत, शहरात नेहमीच घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना, अमली पदार्थांचा सुळसुळाट, अनधिकृत पब आणि बारवर असलेला प्रशासनाचा वरदहस्त अशा अनेक बाबींचा तीव्र निषेध करण्यात आला.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, शेखर धावडे, नितिन रोकडे, नीता गलांडे, वंदना मोडक, सारिका पारेख, फहीम शेख, आसिफ़ शेख, रोहन पायगुड़े, मदन कोठुळे, विक्रम जाधव, अजिंक्य पालकर, पायल चव्हाण, तनया साळुंखे, निलेश वरे आदी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यसभा निवडणुक- 26 नेते बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, अभिषेक मनु सिंघवी यांचा समावेश

दहा राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील...

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका

मुंबई-अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये...

कांदा चालला माॅरिशसला…

महाराष्ट्रातील 1 लाख टन कांद्याची माॅरिशसलाही निर्यात-मुंबई- राज्यातील...