Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुंबईत पाऊस, ताशी 60 KM वेगाने वादळी वारे:दुपारी 3 वाजताच शहरात सर्वत्र अंधार; विमान, रेल्वे सेवा विस्कळीत, घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले, 35 लोक जखमी

Date:

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यासोबतच, मुंबई, पालघरमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजही आयएमडीमने दिला आहे.नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात काही भागात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, सातारा, लातूर, नांदेड जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दादर, घाटकोपरमध्ये मेट्रोचा खोळंबामहाकाय बॅनरखाली 70-80 वाहनं अडकली

मुंबई-सोमवार 13 मे रोजी दुपारी धुळीच्या वादळानंतर पाऊसही सुरू झाला. सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे दिवसा रात्रीसारखे दृश्य मुंबईत दिसू लागले. दुपारी तीन वाजताच मुंबईत सर्वत्र अंधार पडल्यान मुंबई विमानतळावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे वळवण्यात आली आणि काहींचे वेळापत्रक बदलण्यात आले. तसेच घाटकोपर भागात मोठे होर्डिंग थेट पेट्रोलपंपाच्या शेडवर कोसळल्याने यात सुमारे शंभर लोक अडकले होते. यातील सुमारे 35 लोक जखमी झाले आहेत.

मुंबईतील घाटकोपर, वांद्रे, कुर्ला, धारावी परिसरात ताशी 60 किमी वेगाने वारे वाहत आहेत. पुढील 3 ते 4 तासात असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी वाऱ्याचा वेग 50-60 किमी/ताशी असू शकतो. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊ शकतो.

मुंबईतील घाटकोपर परसरात एक महाकाय बॅनर पडून मोठं नुकसान झालं आहे. पेट्रोल पंपावरच हे बॅनर कोसळल्याने पेट्रोल पंपाचं नुकसान झालं असून बॅनरखाली तब्बल 70 ते 80 वाहनं अडकली आहेत. या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील पेट्रोल पंपाखाली बाईक आणि रिक्षा चालक अडकले होते.गॅस कटरच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. विशेष म्हणजे हे बॅनर हटविण्यासाठी महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच संबंधितास नोटीस बजावली होती, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फोनवरुन बोलताना दिली. या दरम्यान,अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.त्याच वेळी, देशात वादळ, पाऊस आणि गारपीट सुरू आहे. हवामान खात्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटही होऊ शकते. राजस्थानमध्ये 16 मेपर्यंत पावसाळा सुरू राहणार आहे.

आज देशातील 25 राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व्यतिरिक्त यामध्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, बिहार आणि झारखंडचाही समावेश आहे. तसेच ईशान्येतील 7 राज्यांचाही समावेश आहे.

पावसामुळे राज्यातील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जवळपास संपुष्टात आला असला तरी उष्णतेचा प्रभाव कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये रविवारी तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले.

राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवसांनी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. रविवारी मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथे देशातील सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मुंबईतील दादर, घाटकोपर परिसरातही वादळी वारं सुटलं असून हवामान ढगाळ झालं आहे. पुढील काही तासांत येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, वातावरण फिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. टॅक्सी, ऑटो व वाहनचालकांनीही जागेवर थांबा केल्याचं दिसून येत आहे. तर, दुसरीडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायवर बॅनर पडल्याने मुंबई मेट्रोचा खोळंबा झाला आहे.

मुंबईसह घाटकोपर परिसरातील न्यू अदानी कॉम्पेलक्सवर असलेले लोखंडी होर्डिंग वाऱ्यामुळे खाली कोसळली. हे लोखंडी होर्डिंग थेट पेट्रोल पंपाच्या शेडवर कोसळल्याचे सांगितले जात आहे. यात काही जीवितहानी होण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एअरपोर्ट रोड स्टेशनवरवर ही मेट्रो थांबली आहे, वादळी वाऱ्यामुळे बॅनर पडल्याने घाटकोपर-वर्सोवो मेट्रो ठप्प झाली. मेट्रो प्रशासनाकडून हा बॅनर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटकोपर येथून वर्सोवा मार्गावर धावणारी ही मेट्रो जागेवर थांबली आहे. त्यामुळे, प्रवाशी खोळंबले असून एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरच अडकून पडले आहेत. दरम्यान, विमानसेवेरही या वादळी वाऱ्याचा परिणाम झाला असून काही विमानांचे उड्डाण वळवण्यात आले असून वेळेतही बदल झाल्याची प्राथमिक माहिती आहे.वाऱ्याचा वेग इतका होता की, मुंबईतील एका ठिकाणी मोठे बॅनर कोसळले,

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...