महागाई, बेरोजगारी, जनतेच्या प्रश्नावर भाजपा गप्प, अनावश्यक मुद्द्यांवर भाजपाचा भर.

Date:

मुंबई, दि. १२ मे २०२४
लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, संविधान धोक्यात आणले आहे, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून दक्षिण भारतातच नाही तर सर्वच राज्यात हवा बदललेली दिसत आहे. ४ जूनला दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी व्यक्त केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शशी थरुर पुढे म्हणाले की, जात, धर्म, भाषा, प्रांत कोणताही असो सर्वप्रथम आपण भारताचे नागरिक आहोत असे संविधानाने स्पष्ट केले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा विचार तसा नाही. भाजपाने नागरिकता मध्ये धर्म आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे जे शब्द वापरत आहेत ते शब्द आपण बंद घरातही वापरू शकत नाही, हे अत्यंत लांछनास्पद असून देश आणि राजकारणातही ते योग्य नाही. भाजपाचे राजकारण पाहता सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढाईत भाग घेतला आहे. ४ जूननंतर खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माचा विकास करणारे व सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार येईल.
निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर बोलत नाही. जनतेचे ज्वलंत प्रश्न टाळून गैरमहत्वाच्या मुद्द्यावरच भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे पण मोदींनी ते स्विकारले नाही. युपीए सरकार असताना डॉ. मनमोहनसिंह हे नेहमी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आता स्क्रिप्टेड मुलाखती देत आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी योग्य समन्वय असून सर्व पक्ष एकत्र येऊन प्रचार करत आहेत. भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले असले तरी कार्यकर्ते मात्र मुळ पक्षाबरोबच आहेत. मविआ- इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय आहे तसा समन्वय एनडीएमध्ये मात्र दिसत नाही, असेही शरी थरूर म्हणाले.

या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, विधान सभेतील उपनेते आमीन पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया समन्वयक प्रगती अहिर, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह आदी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अनिस अहमद इद्रिसी यांनी काँग्रेस पक्षात केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...