पुण्यासाठी ‘फिल्डिंग’, भाजपचे दिग्गज तळ ठोकून,फडणवीस म्हणाले,इथे अजितदादांची हवा

Date:

पुणे-चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.पुणे, शिरुरसह 11 मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. तत्पुर्वी पुण्याचा गड राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. एकीकडे काँग्रेसने रविंद्र धंगेकरांसाठी विदर्भातील नेते प्रचारात उतरवले असतानाच भाजपकडूनही गड राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात तळ ठोकला आहे. आज त्यांची गोखलेनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे.

शरद पवार हे उद्धव ठाकरेंचा पक्ष घेऊन डुबणार

बारामतीची निवडणूक झाल्यावर शरद पवारांचे वक्तव्य ऐकले अन लक्षात आले असेल मोसम बदलला आहे. 4 जूननंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे लागतील. आपले दुकान चालत असताना, आपण दुसऱ्या दुकानात आपले दुकान शिफ्ट करतो का? याचा अर्थ आता अजित पवारांची हवा आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना केले आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की,शरद पवार हे उद्धव ठाकरेंचा पक्ष घेऊन डुबणार आहेत. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भाजप सोबत येण्याचे म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत येण्याची ऑफर दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केला;रशियाकडून तेल खरेदी करणार नाही,व्हेनेझुएलाकडून घेईल-भारताकडून ग्वाही

भारत आणि अमेरिकेदरम्यान ज्या व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती,...

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:EpsteinFiles प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

एपस्टीन फाईल्समधील खुलासे भारताच्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हित आणि...