Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका- आशिष शेलारांची घणाघाती टीका

Date:

इंडिया आघाडीकडून वोट जिहाद

दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनीताई जाधव यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा

मुंबई दिनांक १० मे २०२४
इंडिया आघाडीकडून एक नवीन पद्धतीचा जिहाद सुरू झाला आहे. पूर्वी आपण लँड जिहाद पाहिला, लव जिहाद, भाषा जिहाद बघितला आता वोट जिहाद मुंबईत मोठ्याप्रमाणात सुरू झाला आहे. या वोट जिहादचा प्रमुख आका कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

अश्या देशविरोधी शक्तीच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत म्हणून प्रत्येक राष्ट्रभक्ताचं मत हिरवी चादर पांघरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात पडले पाहिजे असेही आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केले.

दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनीताई जाधव यांच्या प्रचारार्थ परेलच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते आज बोलत होते. महायुतीच्या महाविजयासाठी एकजुटीने काम करण्याचे तसेच मोदी सरकारने केलेली विकासाची कामे घेऊन लोकांमध्ये जाऊन दमदार प्रचार करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी कॅबिनेट मंत्री ॲड.मंगलप्रभात लोढा, महामंत्री संजय उपाध्याय, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, आम्ही कुठल्या धर्माच्या भाषेच्या विरोधात नाही. १९५० ते २०१४ पर्यंत बहुतांश काँग्रेस राजवटीच्या कार्यकाळात जेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढते तेव्हा हिंदुंची संख्या ७.८ टक्क्यांनी कमी होते. यासाठी वोट जिहादच्या विरोधात लढताना आपल्याला आपले राष्ट्र टिकवायचे आहे. आपला हिंदुस्तान ताठ मानेने उभा करायचा आहे. हिंदू एकत्र आला तर यांना त्रास होतो त्यामुळे हिंदू विरोधी सर्वजण एकत्र आले आहेत. गेले दोन ते तीन दिवस मराठी आणि गुजराती वाद पेटविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मराठी आणि गुजराती बांधव दुधात साखर याप्रमाणे मुंबईत राहत आहेत. मराठी भाषा आणि मराठी माणसाचा अपमान भाजप होवू देणार नाही आणि गुजराती माणसांवर अन्यायही चालू देणार नाही असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यावेळी म्हणाले.

त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे..
उबाठा गटालाखूप माज आला आहे, मस्ती चढली आहे. अहंकार आला आहे. हा माज स्वत:च्या जीवावर असता तर ठीक होते पण तोही नाही. उद्धव ठाकरे यांचं प्रत्येक भाषण मी पाहतो. विरोधक काय करतात ते पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांना कुणीही विचारत, कुणाच्या मनात प्रश्नही नाही तरीही ते सारखं म्हणतात मी, मर्दांचा पक्ष आहे. आमच्या मनात त्यांच्याबद्दल काही शंका नाही. स्वतःच्या मर्दुमकिवर अरविंद सावंत यांनी माज, मस्ती अहंकार केला तर समजू शकतो. ते इतके घाबरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यांच्या समर्थकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिलं ज्या मशीनवर तुम्हाला कमळ दिसणार आहे तिकडे तुम्हाला मशाल बटन दाबायचे आहे. अशा प्रकारचा अपप्रचार केला जात आहे. उबाठा गटाला कोणी मत द्यायला तयार नाही म्हणून ही खोटं पसरवत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली युती पक्की राहील. जिकडे कमळ आहे तिकडे धनुष्यबाण राहील. त्यामुळे धनुष्यबाण हे निशाणी असणारे बटन आपल्याला दाबायचे आहे असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

एका विशिष्ट वर्गाच्या मतासाठी उद्धव ठाकरे यांचा कुर्निसात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात आपल्याला एक आव्हान केले आहे त्यावर करताना आपल्याला सजग राहायला सांगितले आहे. डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला सांगितले आहे. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी माहीमच्या काही लोकांना शिवसेना भवनात बोलावलं. एका विशिष्ट रंगाच्या लोकांना बोलावून हिरवी चादर घालून त्यांना बसवलं आणि उद्धव ठाकरे त्यांना म्हणाले, हो गया, झालं गेलं विसरून जा…विसरून जा म्हणजे काय? त्या माहीममध्ये याकूब मेमनने त्याच्या स्कूटरमध्ये भरलेला आरडीएक्स मुंबईतील बारा ठिकाणी ठेवून बॉम्बस्फोट करून मुंबईकरांचा बळी घेतला. त्या याकूब मेमनच दहशतवादी कृत्य उद्धव ठाकरे हिंदूंना आणि मराठी माणसाला विसरायला लावत आहेत. विसरा म्हणून सांगत आहेत हा वोट जिहाद आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांनी कसाबच्या विरोधातील लढाई लढली. २६/११ दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्या हुतात्म्यांचा अपमान करण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काँग्रेस करत आहे. काँग्रेसचे वडेट्टीवार सांगतात, कसाबने गोळीबार केलाच नाही. कसाबने मुंबईवर हल्ला केला नाही. कसाबने १६७ निष्पाप मुंबईकरांचे प्राण घेतले नाहीत. कसाबच्या गोळीने आमचे वीर अधिकारी मारले गेले नाहीत. एका विशिष्ट वर्गाच्या मतासाठी उद्धव ठाकरे कुर्निसात करत आहेत. हा वोट जिहाद मुंबईत पसरवण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. उबाठाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना मते मिळविण्यासाठी १९९३ च्या दंगलीतील आरोपी इकबाल मुसा याची मदत घेतली आहे. ज्याला दहा वर्षे शिक्षा झाली होती त्याच्या मदतीवर उद्धव ठाकरे मते मागत आहेत अशीही टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...