पुणे-तानाशाह अब तेरी नही खैर, बाहर आ रहा है बब्बर शेर! अशा शब्दात आम आदमी पार्टी, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यावर आनंद व्यक्त करताना प्रतिक्रिया नोंदविली आहे.
मुकुंद किर्दत म्हणाले,’ आज अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळालाय ही आम आदमी पार्टीसाठी अत्यंत आनंदाची बाब आणि लोकशाहीसाठी, संविधान बचावासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. चौकशीच्या नावाखाली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अडकून ठेवायचे, निवडणुकीच्या प्रचारापासून थांबवायचे सर्व प्रयत्न भाजपाच्या मोदी सरकारने केले. परंतु कोर्टामध्ये मात्र ई डी ला फटकारले गेले, दीड वर्षापेक्षा अधिक काळ ही चौकशी चालू असताना यापूर्वी सुद्धा ही अटक करू शकले असते अथवा काही दिवसानंतर. वीस-पंचवीस दिवसांनी काहीच फरक पडणार नाही असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने म्हटले. निवडणुकीच्या प्रचारामध्ये अरविंद केजरीवाल यांना प्रचार करताना कुठलेही बंधन नाही नाहीत आणि त्याचे प्रत्युत्तर विरोधी पक्षाने करावं अशी तोंडीं टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली. गेल्या काही दिवसांमध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रचारामध्ये 400 पार ची घोषणा केली, ती बदलून, बीजेपि फिरसे एकबार, मंगळसूत्र ,अदानी अंबानी, लोकसंख्या वाढ असे अनेक विषय हाताळले. परंतु स्वतःच्या कामाविषयी मात्र ते बोलत नाहीत आणि आता मतदार नरेंद्र मोदी या आणि भाजपच्या प्रचारामध्ये फसणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच वेळेस अरविंद केजरीवाल यांचे प्रचारात उतरण हे महत्त्वाचं ठरणार असून त्यामुळे दिल्ली पंजाब हरियाणा गुजरात आदी भागात मोठा फरक पडेल अशी अपेक्षा आहे. आम आदमी पार्टीचा बब्बर शेर आता प्रचारात उतरणार आहे त्यामुळे ‘ हवा का रूख बदल गया है, तानाशाह अब तेरी खैर नही, क्योकी बाहर आ रहा है बब्बर शेर ‘