तापमान 42 अंशांवर असतानाही उरणमध्ये बारणे पोचले 50 गावांपर्यंत

Date:

उरण, दि. 27 एप्रिल – कडक उन्हाळ्यात तापमान 42 अंशांवर गेलेले असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारातील उत्साह तसूभरही कमी झाला नसल्याचे आज (शनिवारी) पहायला मिळाले. रणरणत्या उन्हात बारणे यांनी उरण तालुक्यातील तब्बल पन्नास गावांपर्यंत जाऊन मतदारांशी संपर्क साधला.

खासदार बारणे यांनी उष्णतेच्या लाटेची पर्वा न करता उरण तालुक्याचा प्रचार दौरा केला. त्यांच्या समवेत आमदार महेश बालदी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भार्गव पाटील, तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर तसेच कौशिक शहा, जयवीन कोळी, जितेंद्र घरत, महेश कडू, शशी पाटील गोपीनाथ म्हात्रे, दीपक ठाकूर, संदेश म्हात्रे, संदेश ठाकूर, समद भोंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रणरणत्या उन्हात उघड्या विजय रथावर उभे राहून खासदार बारणे मतदारांना नमस्कार करून व हात उंचावून अभिवादन करत होते. उन्हापासून रक्षणासाठी त्यांनी धनुष्यबाण चिन्ह असलेली भगवी टोपी परिधान केली होती. खासदार बारणे यांचा उत्साह पाहून अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साहही दुणावला. प्रचार फेरीच्या मार्गावर ठिकठिकाणी झाडांच्या सावलीला व आडोशाला उभे राहून लोक बारणे यांची वाट पाहत होते. फटाके वाजवून, फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत प्रत्येक गावात बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रचार फेरीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी ग्रामस्थांकडून थंड पाणी, सरबत, ताक यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना थोडासा थंडावा मिळत होता.

उरण तालुक्यातील मोरा येथून प्रचार फेरीला सुरुवात झाली. आमदार बंगला, गणपती चौक, करंजा, मुळेखंड, तेलीपडा, द्रोणागिरी नोड, बोकडविरा, फुंडे, डोंगरी, पाणजे, सोनारी, करळ, जसरखार, नवघर, भेंडखळ, खोपटे, कोप्रोली, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवळणे, आवरे, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठीजुई, कळंबुसरे, चिरनेर, विंधणे, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, शिव समर्थ संग्रहालय, जासई, गव्हाण, कोपर, शेलगर, न्हावा, नवा खाडी, डेल्टा, कोपर तला, बिकानेर सेक्टर 17, ठाकूर रेसिडेन्सी, भूमिपूजन भवन, बामण, डोंगरी गाव, सेक्टर 21 भाजप कार्यालय मार्गे करंजाडे सेक्टर 24 येथे प्रचार फेरीची सांगता झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...