पुणे-महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आदरंजली वाहिली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे, माजी आमदार , लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,सरचिटणीस अजित दरेकर, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेविका लता राजगुरू, अनुसूचित विभाग शहर अध्यक्ष सुजित यादव, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा,प्रशांत सुरवसे, अमर गायकवाड, चेतन अग्रवाल, गेहलोत आणि महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.