पुणे :पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Highway)बाणेर येथे अनधिकृतपणे उभारलेल्या फर्निचर मॉल, शो-रुम इत्यादीवर बांधकाम विकास विभागाच्या (Construction Development Department) वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1 लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.
मागील काही दिवसांपासून मुंबई – बंगळुरु महामार्गावर मोठ्या प्रमाणात फर्निचरची अवैध दुकाने थाटण्यात आली होती. संबंधित मोठे शोरूम टाकण्यासाठी कुणाचीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच करही भरण्यात आला नव्हता. मनपाने वारंवार नोटीस बजावूनही ही अनधिकृत बाधकामे काढण्यात येत नव्हती. अखेर मनपाने गुरुवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात या दुकानांवर जेसीबी चालवून कायदेशीर कारवाई केली.
हे बांधकाम HEMRL (High Energy Materials Research Laboratory) या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढील आठवड्यात उर्वरित दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे.यावेळी कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. हिंजवडी पोलीस स्टेशनचे (Hinjewadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.महापालिकेने संबंधित दुकानांना 1 महिन्यापूर्वीच नोटीस देऊन जागा खाली करण्याची सूचना केली होती. पण दुकानदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे मनपा प्रशासनाला नाईलाजाने ही कारवाई करावी लागली. ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintending Engineer Yuvraj Deshmukh),कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे (Executive Engineer Bipin Shinde) यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनिल कदम,शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गडइ यांनी केली.

